मल्ल्याची संपत्ती होणार जप्त

By admin | Published: November 12, 2016 04:15 AM2016-11-12T04:15:35+5:302016-11-12T04:15:35+5:30

आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याची देशातील १७०० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता लवकरच जप्त करणार असल्याची माहिती

Mallya's assets will be seized | मल्ल्याची संपत्ती होणार जप्त

मल्ल्याची संपत्ती होणार जप्त

Next

मुंबई : आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याची देशातील १७०० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता लवकरच जप्त करणार असल्याची माहिती शुक्रवारी सक्तवसुली संचालयानाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) दिली. गुरुवारीच विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित करून त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी दिली.

विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाची मूळ प्रत हातात पडली, की आम्ही तातडीने मल्ल्याच्या नावावर असलेले शेअर्स ताब्यात घेऊ. मल्ल्याची जंगम मालमत्ता व शेअर्सची किंमत एकूण १७०० कोटी रुपये आहे. ही जप्ती फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) अंतर्गत करण्यात येणार आहे.

यापूर्वी ८,०४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने केलेल्या अर्जावरील सुनावणीत विशेष न्यायालयाने मल्ल्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देत त्याला फरारी घोषित केले. मात्र मल्ल्याची परदेशातील संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. परदेशातील संपत्तीचे कागदपत्र सादर करा, मग त्यावर विचार करू, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. मल्ल्या देशात परत यायला तयार नसल्याने ईडीने त्याला फरारी म्हणून घोषित करावे व त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी आॅक्टोबरमध्ये अर्ज केला होता. 

ईडीच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाई
आयडीबीआय बँकेचे घोटाळा आणि पीएमएलएअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी ईडीला मल्ल्याची चौकशी करायची आहे. मल्ल्याला देशात परत आणण्यासाठी इंटरपोल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले. तसेच त्याचा पासपोर्ट जप्त करूनही त्याला देशात परत येता यावे, यासाठी पासपोर्टची तात्पुरती सोय करून देण्याची तयारीही तपासयंत्रणेने दाखवली. मात्र मल्ल्या कशालाच दाद देत नसल्याने अखेरीस ईडीने त्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग निवडला. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने मल्ल्याची आतापर्यंत ८,०४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या इतिहासात ही सगळ्यात मोठी जप्ती आहे.

Web Title: Mallya's assets will be seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.