कुपोषणविषयक कार्यशाळा

By Admin | Published: June 11, 2016 01:47 AM2016-06-11T01:47:25+5:302016-06-11T01:47:25+5:30

यशवंतराव चव्हाण सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कुपोषणविरोधी चळवळ कार्यशाळा आयोजित करण्यात आली

Malnutrition Workshop | कुपोषणविषयक कार्यशाळा

कुपोषणविषयक कार्यशाळा

googlenewsNext


वडगाव मावळ : पंचायत समितीच्या येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कुपोषणविरोधी चळवळ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पोषण चळवळीमध्ये मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रामध्ये १५ एप्रिल २०१६ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमातून मुख्यत्वे किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनदा माता व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यशाळेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेजगे यांनी किशोरवयीन मुली, गरोदर महिला व स्तनदा माता व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका एस. एस. जोशी यांनी पोषण चळवळीविषयक माहिती दिली.
पोषण चळवळीच्या वृद्धीपत्रकाचे प्रकाशन पंचायत समिती सभापती मंगला वाळुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. गटविकास अधिकारी नीलेश काळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वायदंडे, कृषी अधिकारी संताजी जाधव, तालुक्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना बालविकास प्रकल्प अधिकारी ए. आर. गुजर यांनी केले. (वार्ताहर)
>७ जून रोजी सर्व बालकांची पालकांच्या समोर उंची घेण्यात आली
असून, १५ जून रोजी सर्व बालकांचे पालकांच्या समोर दंडघेर मोजण्यात येणार आहे. सर्व बालकांचे सद्य:स्थितीविषयी ग्रामपंचायतीस
अवगत करून त्याचे २६ जानेवारी २०१७ला ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश आहार व आरोग्याविषयी
लोकांमध्ये जनजागृती करून कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग
वाढवणे आहे.

Web Title: Malnutrition Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.