"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:06 PM2024-11-24T12:06:33+5:302024-11-24T12:08:19+5:30
Malshiras Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result : माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Assembly constituency) भाजपचे राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून सातपुतेंनी मतांची आघाडी घेत उत्तम जानकरांना काट्याची टक्कर देऊन धाकधूक वाढवली होती; पण १७व्या फेरीपासून पूर्व भागातील मोहिते- पाटील व उत्तम जानकरांच्या हक्कांच्या गावातून जानकरांना मतांची आघाडी मिळाली आणि उत्तम जानकर यांनी १३ हजार १४८ मताधिक्याने राम सातपुते यांचा पराभव केला.
राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मात्र यावेळी त्यांनी पराभवाची खापर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडत कारवाईची मागणी केली आहे. माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले, संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, असा आरोप करत रणजितसिंह मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी राम सातपुते यांनी ट्विटद्वारे केली आहे.
माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला.
— Ram Satpute (@RamVSatpute) November 24, 2024
कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला.
भाजपा कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.
भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण… pic.twitter.com/CuvL4B689t
दरम्यान, माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती. मात्र, यात राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट देत बाजी मारली. राम सातपुते यांनी मतमोजणीच्या १६व्या फेरीपर्यंत झुंज दिली. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातून राम सातपुतेंनी मतांची आघाडी घेत उत्तम जानकरांना काट्याची टक्कर देऊन धाकधूक वाढवली होती; पण १७व्या फेरीपासून पूर्व भागातील मोहिते- पाटील व जानकरांच्या हक्कांच्या गावातून जानकरांना मतांची आघाडी मिळाली आणि अखेर उत्तम जानकर यांनी १३ हजार १४८ मताधिक्याने राम सातपुते यांचा पराभव करीत विजयाला गवसणी घातली.
विजयाचे फॅक्टर
- मतदारसंघात मोहिते-पाटील व जानकर दोन गट एकत्र आलेले होते. मोहिते-पाटलांची मोठी साथ मिळाली.
- लोकसभेच्या निवडणुकीनंतरही शरद पवार गटाचा प्रभाव कायम राहिला. त्यामुळे 'तुतारी'कडे जनता कायम राहिली.
- भाजपचे उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगत प्रचार केला. त्याचाही परिणाम थोडा फार दिसला.