मुलुंडमध्ये महिलेची निर्घृण हत्या, पतीविरुद्ध गुन्हा

By admin | Published: January 28, 2017 04:21 AM2017-01-28T04:21:21+5:302017-01-28T04:21:21+5:30

: ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी मुलुंडमध्ये घडली. श्रेया जयेश म्हाडलेकर (३०) असे या महिलेचे नाव

Malunde murder case against husband, crime against husband | मुलुंडमध्ये महिलेची निर्घृण हत्या, पतीविरुद्ध गुन्हा

मुलुंडमध्ये महिलेची निर्घृण हत्या, पतीविरुद्ध गुन्हा

Next

मुंबई : ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी मुलुंडमध्ये घडली. श्रेया जयेश म्हाडलेकर (३०) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या भांडणाला कंटाळून श्रेया सहा महिन्यांपासून आईकडे राहत होती. गुरुवारी ती कामावर तसेच कोठेही सापडत नसल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी जयेशच्या घराकडे धाव घेतली. तेव्हा श्रेया रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसून आली. त्यांनी याबाबत मुलुंड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी श्रेयाचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला आहे. प्राथमिक तपासात तिच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून पतीनेच तिची निर्घृण हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malunde murder case against husband, crime against husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.