मालवणी दारुकांडातील मुख्य आरोपीला इंदूरमधून अटक

By admin | Published: May 23, 2017 12:12 AM2017-05-23T00:12:35+5:302017-05-23T00:31:28+5:30

मालवणीतील विषारी दारुकांड प्रकरणातील एका मुख्य आरोपीला इंदूरमधून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

Malwani Darukanda main accused arrested from Indore | मालवणी दारुकांडातील मुख्य आरोपीला इंदूरमधून अटक

मालवणी दारुकांडातील मुख्य आरोपीला इंदूरमधून अटक

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मालवणीतील विषारी दारुकांड प्रकरणातील एका मुख्य आरोपीला इंदूरमधून ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 
 
धर्मेंद्र जिवबाली सिंग तोमर उर्फ संजय सिंग असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या दोन वर्षापासून फरार होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संजय सिंग याला काल मध्यप्रदेशातील इंदूर येथील राजेंद्रनगर परिसरातून अटक केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सोमवारी दिली. 
 
मुंबईतील मालाड- मालवणीमध्ये 2015 साली विषारी दारु प्राशन केल्यामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मालवणीतील लक्ष्मीनगर आणि आसपासच्या परिसरातील काही मजुरांनी तेथील गावठी दारुच्या गुत्त्यातून दारु प्राशन केली होती. या घटनेमुळे देशभरात हाहाकार माजला होता.
 
 
 

Web Title: Malwani Darukanda main accused arrested from Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.