शौचालयासाठी ठेवले मंगळसूत्र गहाण

By Admin | Published: February 15, 2015 08:46 PM2015-02-15T20:46:10+5:302015-02-15T23:40:40+5:30

निर्मलतेची मोहीम फत्ते : ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या संगीता आव्हाळे यांच्या बातमीवरून घेतली प्रेरणा

Mammals kept for toilets | शौचालयासाठी ठेवले मंगळसूत्र गहाण

शौचालयासाठी ठेवले मंगळसूत्र गहाण

googlenewsNext

कवठे : वाशीम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे यांनी घरातून प्रचंड विरोध होऊन मंगळसूत्र गहाण ठेवले आणि स्वच्छतागृह बांधले. शासनदरबारी त्यांचे कौतुक होऊन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वखर्चाने आणि सन्मानाचे तिचे सौभाग्याचे लेणं तिला परत मिळवून दिले. या घटनेला ‘लोकमत’ने प्रसिद्धी दिली. ‘लोकमत’मधील याच बामतीतून प्रेरणा घेऊन वाई तालुक्यातील रत्ना मधुकर खुडे यांनी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवून स्वच्छतागृह बांधले. याबाबतची हकिगत अशी की, रत्ना खुडे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य पती मधुकर यांच्यासोबत मुंबई येथे व्यतीत केले. पती, पत्नी व मुलगी अर्चना एवढेच हे त्रिकोणी कुटुंब. नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी मुलीचे लग्न करून दिले व मधुकर पत्नीसह कवठे येथील आपल्या वाडवडिलांच्या जुन्या घरी वास्तव्यास आले.घराचे नूतनीकरण करायचे व स्वच्छतागृह बाथरूम बांधण्याची त्यांनी तयारी केली; पण याच दरम्यान मुलीची प्रसूती जवळ आल्याने ते उरकूनच घर दुरुस्ती करण्याचे त्यांनी ठरविले. मुलीला प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल केले. यामध्ये साठवलेला बराचसा खर्च झाला. मुंबईत वास्तव्य केलेले कुटुंब गावी आले; पण त्यांनी उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी संकोच वाटू लागला. त्यातूनच रत्ना खुडे यांनी धाडशी निर्णय घेत स्वत:चे मंगळसूत्र घाण ठेवून स्वच्छतागृह बांधण्याचा निर्धार आपल्या पतीस सांगितली व त्यांनीही त्यास संमती दिली. आज त्यांचे शौचालय बांधून पूर्ण झाले आहे. कवठे ग्रामपंचायतीकडे त्यांनी अनुदान मागणीसाठी अर्ज केला असून, ग्रामपंचायतीने त्यांना ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत १२ हजारांचे अनुदान देण्याचे सांगितले आहे. तसेच खुडे दाम्पत्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)

पतीची साथ मोलाची...
ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या अनुदानातून मी माझे मंगळसूत्र सोडविणार आहे. उघड्यावर जाण्याच्या कटकटीतून मुक्तता मिळवण्यासाठी प्रसंगी पतीने मंगळसूत्र घाण ठेवण्यास दिलेली संमती हिच माझ्यासाठी आयुष्यातील खरी संपत्ती आहे, अशा भावना रत्ना खुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

‘लोकमत’ने या आधी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने मंगळसूत्रापेक्षा व पैशापेक्षा मूलभूत गरजांना महत्त्व देण्याच्या हेतूने तसेच समाजाची याविषयीची सद्भावना पाहून ‘लोकमत’च्या बातमीपासून प्रेरणा घेऊनच मी हे धाडस केले.
- मधुकर खुडे

Web Title: Mammals kept for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.