ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४

By admin | Published: June 22, 2016 04:13 AM2016-06-22T04:13:24+5:302016-06-22T04:13:24+5:30

सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणात एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची ठाणे पोलिसांनी आरोपी क्रमांक १४ अशी नोंद केली आहे

Mamta Kulkarni accused no. 14 | ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४

ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४

Next

ठाणे : सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणात एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची ठाणे पोलिसांनी आरोपी क्रमांक १४ अशी नोंद केली आहे. केनियात झालेल्या इफे ड्रीनच्या तस्करीत तिने चांगली ‘भूमिका’ बजावल्यामुळे तिला एव्हॉनचे संचालक किंवा व्यवस्थापकपदही बहाल केले जाणार होते, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली.
ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ दोन महिन्यांपूर्वी सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना इफे ड्रीनच्या तस्करी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडील माहितीतूनच एव्हॉनचा संचालक मनोज जैन, व्यवस्थापक पुनित श्रींगी, नरेंद्र कांचा आदी दहा जणांना पोलिसांनी वेगवेगळया भागातून अटक केली. तर एव्हॉनमधून अडीच हजार कोटींचा सुमारे २३ टन इफे ड्रीन आणि सुडोइफे ड्रीनचा साठाही पोलिसांनी हस्तगत केला. याच प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री कुलकर्णी यांचीही नावे तपासात उघड झाली. यात सध्या ममता, विकी, सुशिल सुब्रमण्यम आणि तांजानियातील रहिवाशी डॉ. अब्दुल्ला या चौघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)एव्हॉनमधील इफे ड्रीनची केनियासह इतर देशांमध्येही तस्करी करण्यासाठी ममता, मनोज जैन, जयमुखी किशोर राठोड आणि विकी गोस्वामी यांच्यात वारंवार केनियामध्ये बैठका झाल्या. या बैठकांचे सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. ममताच्या ओशिवारा येथील दोन्ही सदनिकांच्या मेन्टनन्सचे पैसेही विकीकडून दिले जात होते. ८ जानेवारी २०१६ मध्ये केनियात झालेल्या बैठकीतही ममता होती. इफे ड्रीनच्या तस्करीपोटी हवालाद्वारे ममता, विकी, जयमुखी आणि जैन यांना करोडो रुपये मिळाल्याचे सबळ पुरावेही हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ममता आणि तिचा कथित पती विकी हे केनियात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केनिया आणि भारत यांच्यात आरोपी प्रत्यार्पणाचा करार नाही. मात्र, रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर त्यांना कोणत्याही देशातून इतरत्र पळ काढता येणार नाही. २कोणत्याही देशाच्या विमानतळावर ते आले तर इंटरपोलमार्फत त्यांची माहिती ठाणे आणि
अमेरिकेच्या पोलिसांना मिळू शकणार आहे. त्यादृष्टीने आता ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बी. के. शेळके यांनी ‘लोकमत’ ला दिली.

Web Title: Mamta Kulkarni accused no. 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.