ममता कुलकर्णीवरही आवळला कारवाईचा फास
By admin | Published: January 11, 2017 07:28 AM2017-01-11T07:28:40+5:302017-01-11T07:28:40+5:30
सुमारे दोन हजार कोटींच्या इफे ड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक विकी गोस्वामी याच्याविरुद्धचे पाचवे पुरवणी
जितेंद्र कालेकर / ठाणे
सुमारे दोन हजार कोटींच्या इफे ड्रीन प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक विकी गोस्वामी याच्याविरुद्धचे पाचवे पुरवणी आरोपपत्र ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून लवकरच ठाण्याच्या विशेष न्यायालयात सादर केले जाणार आहे. गुजरात पोलिसांनी याच प्रकरणातील किशोर राठोड याला अटक केली असल्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यावरही कारवाईचा फास आवळला जाणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.
गुजरात पोलिसांनी मध्यप्रदेशच्या चंबळ खोऱ्यातून अहमदाबादच्या माजी काँगे्रस आमदाराचा पुत्र किशोर राठोड याला दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे. ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी तसेच सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीचा मुख्य संचालक मनोज जैन याच्याशीही किशोरचे निकटचे संबंध आहेत. त्यानेच विकी आणि जैन यांची भेट घडवून आणली होती. तसेच करोडो रुपयांच्या इफेड्रीनची देश विदेशात तस्करी करण्यासाठी महत्वाची भूमीका बजावल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे, गुजरात दहशतवाद विरोधी पथकासह केंद्रीय अन्वेषण विभागाचेही पोलीस त्याच्या मागावर होते. तो चंबळ खोऱ्यात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी अहमदाबाद पोलिसांनी त्याला अटक केली.
तो ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इफेड्रीन प्रकरणात तसेच सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस कंपनीतील इफेड्रीन तस्कीतही वान्टेड असल्यामुळे त्याची ठाणे न्यायालयाकडून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. न्यायायाच्या परवानगीने त्याला लवकरच ठाण्यात आणले जाणार आहे. (प्रतिनिधी)
१२ जणांविरुद्ध आरोपपत्र
इफेड्रीन प्रकरणात आतापर्यंत मनोज जैनसह १२ जणांना अटक करण्यात आली आहे. आता किशोर राठोडला अटक झाली असून विकी गोस्वामी त्याची मैत्रिण ममता कुलकर्णी हे वान्टेड आहेत. यातील विकीविरुद्ध पाचवे पुरवणी आरोपपत्र येत्या काही दिवसांमध्ये ठाण्याच्या विशेष न्यायालयात सादर केले जाणार आहे.
राठोड ठरणार महत्त्वाचा दुवा
विकीची मैत्रिण ममता विरुद्ध बरेच भक्कम पुरावे असून तिच्यावर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. राठोड हा यातील महत्वाचा दुवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिचे अंधेरीतील तीनही फ्लॅट हे विकीची आणि तिची ओळख होण्यापूर्वीचे असल्यामुळे ते ताब्यात घेतले नसल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
च्त्यापाठोपाठ २३ जून २०१६ रोजी कंपनीचा संचालक मनोज जैन, सल्लागार पुनित श्रींगी, नरेंद्र काचा, नवी मुंबईचा हरदीप गिल आणि बाबा धोत्रे या पाच जणांविरुद्ध ३८५ पानांचे दुसरे आरोपपत्र दाखल केले होते.
च्इफे ड्रीनची तस्करी करण्यात मोठा वाटा उचलणारा जयमुखी याच्याविरुद्ध तिसरे आरोपपत्र दाखल झाले आहे.
इफे ड्रीन प्रकरणात अमली पदार्थाच्या तस्करीचा आरोप असलेला शिपिंग कंपनीचा संचालक सुशिलकुमार असिकन्नन अदिद्रविड आणि इफे ड्रीनची नायजेरियात विक्री करणारा फेलिक्स ओमोबी ओसिटा या दोघांविरुद्ध चौथे २०० पानांचे पुरवणी आरोपपत्र ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एच. पटवर्धन यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. तर पाचवे आरोपपत्र आता विकी गोस्वामीविरुद्ध दाखल केले जाणार आहे.