ड्रग्जच्या रॅकेटमागे ममता कुलकर्णी!

By admin | Published: June 19, 2016 05:05 AM2016-06-19T05:05:06+5:302016-06-19T05:05:06+5:30

इफेड्रीन या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून तिच्यासह ड्रग्ज माफिया डॉ. अब्दुला आणि त्याच्या दोन

Mamta Kulkarni behind the drug rackets! | ड्रग्जच्या रॅकेटमागे ममता कुलकर्णी!

ड्रग्जच्या रॅकेटमागे ममता कुलकर्णी!

Next

ठाणे : इफेड्रीन या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून तिच्यासह ड्रग्ज माफिया डॉ. अब्दुला आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे पोलिसांनी एप्रिलमध्ये सोलापूर एमआयडीसीतील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीवर छापा टाकून जवळपास साडेवीस टन इफेड्रीन पावडरचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी दोघांनी न्यायालयात दिलेल्या साक्षीवरून ममता कुलकर्णी हिचे नाव पुढे आल्याने हा गुन्हा दाखल केला. याशिवाय बॉलीवूडमधील तीन ते चार मंडळींचीही नावे पुढे आली असून, त्यांच्याबाबत आताच सांगणे योग्य नसल्याचे परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले. वर्तकनगर
पोलीस ठाण्यात इफेड्रीन प्रकरणी
दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या १७ वर गेली आहे. ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी याची केनियात काही जणांबरोबर बैठक झाली होती. (प्रतिनिधी)

फरारपैकी एक भारतात; सहा जण परदेशात
- वर्तकनगर पोलीस ठाण्यात इफेड्रीन
प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता १७ वर गेली आहे.
- या गुन्ह्यात फरार असलेल्या सात जणांपैकी किशोर राठोड हा भारतात असल्याची तसेच ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी आणि त्याची पत्नी ममता कुलकर्णी, डॉ. अब्दुला, त्याचे दोन साथीदार आणि सुशीलकुमार हे परदेशात, विशेषत: केनियात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

चौघांवर दोषारोपपत्र : आतापर्यंत प्रमुख सूत्रधार मनोज जैन, पुनीत श्रींगी आणि जय मुखी यांच्यासह १० जणांना अटक केली असून, ते सर्व जण कोठडीत आहेत आणि ७ जणांना फरार घोषित केले आहे. या गुन्ह्यात सागर पोवळे, मयूर सुखदरे, धानेश्वर स्वामी आणि राजेंद्र डिमरी या चौघांवर सबळ पुराव्यांच्या आधारे नुकतेच विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

अब्दुल्लाचा फोटो पोलिसांकडे
डॉ. अब्दुल्ला याचा फोटो पोलिसांच्या हाती लागला असून त्यानुसार, त्याची ओळख पटविण्याचे काम
सुरू आहे. या फोटोचा
फायदा होईल, असा विश्वास वर्तविला आहे.

दरमहा १० टन
साठा जाणार होता
परदेशात दरमहा १० टन इफेड्रीनचा साठा पाठविण्याचे निश्चित झाले होते. मात्र, तो साठा पाठविला का? जर पाठविला असेल तर तो किती पाठविला याबाबत माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यायालयात दोन साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीत ममता कुलकर्णी हिची भूमिका असल्याचे पुढे आले. तसेच २०१६मध्ये झालेल्या दोन बैठकीत ती उपस्थित होती. त्यानुसार, तिच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच बॉलीवूडच्या आणखी तीन ते चार मंडळींची नावे पुढे आली आहेत.
- परमबीर सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

Web Title: Mamta Kulkarni behind the drug rackets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.