ममता म्हणते, आता मी योगिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 04:53 AM2016-09-10T04:53:18+5:302016-09-10T04:53:18+5:30

ड्रग्ज प्रकरणात आपले नाव नाहक गोवण्यात आले असून मी पूर्णत: निर्दोष आहे, असे सांगत मी आता योगिनी बनले आहे.

Mamta says, now I am Yogi | ममता म्हणते, आता मी योगिनी

ममता म्हणते, आता मी योगिनी

Next


मुंबई : ठाण्यातील दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आपले नाव नाहक गोवण्यात आले असून मी पूर्णत: निर्दोष आहे, असे सांगत मी आता योगिनी बनले आहे. मला या प्रकरणातील फरार आरोपी म्हणून नाही, तर एक पिडीत व्यक्ती म्हणून बघा, असे सांगत बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने शुक्रवारी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
वांद्रे पश्चिमेकडील ताजलँड हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत एका व्हीडीओक्लिपच्या माध्यमातून ममताने आपले म्हणणे मांडले. अभिनेत्री ममता कुलकणीर्ची न्यायालयीन लढाई लढणारे राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार अ‍ॅड. माजिद मेमन, एमझेडएम लीगलचे वरिष्ठ भागीदार अ‍ॅड. परवेझ मेमन, न्यूयॉर्क मधील ममताचे वकील अ‍ॅड. डॅनियल अरशक, केनिया मधील ममताचे वकील अ‍ॅड. क्लिफ ओंबेटा यांच्यासह अटक आरोपी जय मुखीचे वकील सुदीप पासबोला हे यावेळी उपस्थित होते.
’मी महाराष्ट्रातील ब्राम्हण कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. कुटूंबाप्रमाणेच मला अध्यात्माची आवड आहे. १९९० च्या दशकात प्रसिद्धीच्या झोतात असताना मी बॉलिवूड सोडले. त्यानंतर गेली वीस वर्षे मी अध्यात्माचे धडे घेत असून आता योगिनी बनली असल्याचे ममताने व्हीडीओ क्लिपच्या माध्यमातून सांगताना ठाणे पोलिसांनी लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले.
पोलिसांना जो तपास करायाचा आहे तो करू देत, पण नाहक माझे नाव पोलिसांनी या प्रकरणात गोवणे चुकीचे आहे. ठाणे पोलीस दोन हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराविषयी बोलतात. मात्र माझ्या हिंमतीवर कमावलेली २५ ते ३० लाखांची संपत्ती माझ्याकडे आहे. त्याचे सर्व कागदोपत्री व्यवहार मी पोलिसांकडे दिले आहेत. याप्रकरणातील ठाणे पोलिसांनी अटक केलेला आरोपी जय मुखी याच्यावर पोलिसांनी थर्ड डिग्री वापरल्यानंतर त्याने माझे नाव याप्रकरणात घेतल्याची माहिती मला मिळली. असे करणे चुकीचे आहे. पोलिसांनी अटक केलेले दहा आरोपी मला ओळखत नाही, त्यांनी माझे नावसुद्धा घेतले नाही. किंवा तपासामध्ये पोलिसांना माझ्या विरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचे ममताने यावेळी सांगितले.
’ममता सध्या केनियातील मोम्बासा शहरात राहत असून ठाणे पोलीस आणि अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेन्ट मिनिस्ट्रेशन या अंमलीपदार्थविरोधी संस्थेच्या उच्चपदस्थ, हीन आणि अनैतिक कटाची ती बळी ठरली आहे.
अमेरिकन संस्थेच्या थेट हस्तक्षेप, मार्गदर्शन आणि निदेर्शावरुन ठाणे पोलिसांनी तीचे नाव याप्रकरणात गोवले आले आहे. ती एक चांगली कलाकार असून एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहे. ठाणे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या एक मुख्य आणि दोन पुरवणी आरोपपत्रात तीच्याविरोधात एकही पुरावा दिला नाही. ठाणे पोलिसांनी निव्वळ प्रसिद्धीसाठी हे आरोप केल्याची शक्यता असल्याचे ममताच्या सर्व वकिलांनी बाजू मांडताना सांगितले. (प्रतिनिधी)
>विकी फक्त मित्र...
२००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत ठाणे पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विकी गोस्वामी हा मास्टरमाईंड आहे.
गोस्वामी हा कुलकर्णी कथित पती असल्याची माहिती समोर येत असताना तो फक्त मित्र असल्याचा दावा कुलकर्णींच्या वकिलांनी यावेळी केला आहे. दोघांमध्ये कुठलेच संबंध नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
>इफेड्रीन प्रकरण...
ठाणे पोलिसांनी कल्याणमध्ये नायजेरियन ड्रग डिलरला १२ एप्रिलला अटक केली. या डिलरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातून दोन तरुणांना अटक करत पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या.आरोपींकडे केलेल्या चौकशीअंती सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स कंपनीवर छापा टाकून दोन हजार कोटी एफिड्रिन ड्रग्ज जप्त करत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पदार्फाश केला होता.पोलिसांनी याप्रकरणी १२ जणांना अटक केली. या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड ममताचा कथित पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी असल्याचेही उघड झाले आहे. तर विकी आणि ममताला पोलिसांनी फरार घोषित केले आहे.

Web Title: Mamta says, now I am Yogi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.