ट्रेनच्या धडकेत शरीराचे दोन तुकडे होऊनही तो राहिला जिवंत, पोलिसांना सांगितलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 09:02 AM2018-03-07T09:02:59+5:302018-03-07T09:02:59+5:30
नंदूरबार रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी एका व्यक्तीने मालगाडीच्या समोर उडी मारून आत्महत्या केली.
नंदूरबार- नंदूरबार रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी एका व्यक्तीने मालगाडीच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. यामध्ये 39 वर्षीय व्यक्तीच्या शरीराचे दोन तुकडे झाले. पण शरीराचे दोन तुकडे होऊनही हा व्यक्ती काही वेळासाठी जिवंत राहिला पण नंतर त्याचा मृत्यू झाला.
संजय नामदेव मराठे (वय 39) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून मालगाडीसमोर उडी मारल्याने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. या घटनेनंतर संजय मराठे काही वेळासाठी जिवंत राहिले इतकंच नाही, तर त्यांनी पोलिसांना त्यांचं नावही सांगितलं.
या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी गोविंद काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खीरतकर घटनास्थळी पोहचले पण तोपर्यंत संजय यांचा मृत्यू झाला होता. मालगाडीच्या धडकेने शरीराचे दोन तुकडे झालेल्या संजय यांनी त्याच अवस्थेत पोलिसांना त्यांचं नाव सांगितलं. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, संजय मराठे हे रिक्षा चालवायचे. संजय यांनी नेमकी का आत्महत्या केली? याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.