कोरोनानं भाऊ गमावला, विधवा वहिनीसोबत दीरानं केला विवाह; संपूर्ण गावात होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 08:26 PM2022-06-05T20:26:08+5:302022-06-05T20:27:17+5:30

लग्न एक पवित्र बंधन आहे आणि त्याच्याशी निगडीत अनेक रुढी, परंपरा आहे. पण या सर्व परंपरा मोडून दीरानं कोरोनानं मृत्यू झालेल्या भावाच्या पत्नीसोबत विवाहगाठ बांधून तिला पुढील आयुष्यासाठी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

man married with sister in law after he lost his brother | कोरोनानं भाऊ गमावला, विधवा वहिनीसोबत दीरानं केला विवाह; संपूर्ण गावात होतंय कौतुक

कोरोनानं भाऊ गमावला, विधवा वहिनीसोबत दीरानं केला विवाह; संपूर्ण गावात होतंय कौतुक

googlenewsNext

लग्न एक पवित्र बंधन आहे आणि त्याच्याशी निगडीत अनेक रुढी, परंपरा आहे. पण या सर्व परंपरा मोडून दीरानं कोरोनानं मृत्यू झालेल्या भावाच्या पत्नीसोबत विवाहगाठ बांधून तिला पुढील आयुष्यासाठी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मोलगी. बोरणार ता. एरंडोल जि.जळगांव येथील रहिवासी असलेले आणि सध्या नंदुरबार पोलीस दलात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांना दोन मुली, एक मुलगा असे अपत्य आहेत. मोठी मुलगी हिचे लग्न झाले. तसेच दुसर्‍या क्रमांकाची मुलगी चेतना हिला डी.एड्. पर्यंत शिक्षण केले. कुसूंबा ता. जि. धुळे येथील रहिवासी उच्च शिक्षित पुणे येथे नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेले संदिप चंद्रकांत बडगुजर यांचाशी सन २०१५ मध्ये विवाहबद्ध करून मोठ्या थाटामाटात विवाह केला. दोघांचा संसार सुखात चालु होता. त्यांचा संसाररूपी वेलीवर दिव्यांका नावाची कळी उमलली कुटुंबात आनंद उत्सव साजरा झाला. 

दिव्यांका पाच वर्षांची झाली. कोरोना महामारीत ऐन तारुण्यात संदीपचा पुण्यात गेल्या वर्षी २७ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यांचा सुखी संसाराला दीट लागली. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं. चेतना पतीच्या विरहानं खचून गेली. चेतनाचे वडील सहाय्यक फौजदार किशोर बडगुजर यांनी मुलगी चेतना, नात दिव्यांका हिचा एक वर्ष सांभाळ केला. समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, पदाधिकाऱ्यांसह तसेच सासर व माहेरकडील मंडळींनी चेतनाची समजुत घालून विचार विनिमय करून चेतना व दिर हर्षल ऊर्फ किरण यांना भावी जीवनाची भूमिका पटवून दिली. 

चेतना व हर्षल यांनी सर्वांचे मत विचारात घेऊन कोणताही प्रकारचा अटी शर्ती न ठेवता दोघांनी एक दुसर्‍याचा जीवनात येवून खांद्याला खांद्या लावून संसार थाटायचा निर्णय घेतला. मुलगी दिव्यांका हिचे पालन पोषण व भविष्यातील सर्व सुख, दुःख सांभाळण्याची जबाबदारी घेऊन चेतनाचा स्विकार केला. चेतनानेही दिरा सोबत लग्न करण्यास संमती दिली. चेतनाचे आई वडील तसेच हर्षलचे आई वडील, नातेवाईक, समाज बांधवानकडून पुणे आळंदी येथे २५ मे २०२२ रोजी एकत्र येऊन समाजातील रुढी परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. 

चेतनाचा ऐन तारुण्यात पती निधनाचे दुःख जीवनात नैराश्य निर्माण करणारे होते. मात्र दिर हर्षल याने खंबीरपणे साथ देऊन जीवनसाथी म्हणून स्वीकारले. चेतनाचा जीवनातील दुःख, विरह नष्ट करण्याचा प्रयत्न हर्षलनं केल्यानं सर्व स्तरावरून त्यांचावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांना विवाहबद्ध करण्यासाठी समाजातील जेष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर दिलीप नारायण बडगुजर, राजेंद्र नारायण बडगुजर, दिलीप गिरधर शिंदे, स्नेहलकुमार दिलीप शिंदे, संजय मधुकर बडगुजर, काशिनाथ उत्तम बडगुजर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. म्हसावद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्तीराव पवार यांनी दोघा उभयतांना पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्यात. समाज बांधवानकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

Web Title: man married with sister in law after he lost his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव