कारभारणींना हवाय खराखुरा कारभार!

By admin | Published: February 8, 2015 11:53 PM2015-02-08T23:53:02+5:302015-02-09T00:42:04+5:30

अधिकार स्वातंत्र्याबाबत प्रश्नचिन्ह : जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर येतेय गदा--लोकमत सर्वेक्षण

The management of the real work! | कारभारणींना हवाय खराखुरा कारभार!

कारभारणींना हवाय खराखुरा कारभार!

Next

सातारा : आरक्षणामुळे महिलांना राजकारणात संधी मिळाली. या संधीचं सोनं करीत त्यांनी राजकीय क्षेत्रात भरारी घेतली. शिक्षण, निर्णय घेण्याची क्षमता, काम करण्याची धडाडी यामुळे महिला आज राजकारणात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना दिसतात. मात्र, पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात महिलांना काम करताना त्यांच्या अधिकाराचं स्वातंत्र्य मिळतं का? त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं का? त्यांना त्यांची मतं सभागृहात माडू दिली जातात का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कऱ्हाड पंचायत समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांनी ‘आम्हाला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, आमचं कोणी ऐकत नाही, अशी तक्रार करत डोळ्यातून अश्रू ढाळले. महिला पदाधिकाऱ्यांना निर्णय प्रक्रियेत डावलले जातेय का, याबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील महिला पदाधिकाऱ्यांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणात कारभारणींनी खराखुरा कारभार करण्याची भावना व्यक्त केली. तर काही याबाबत बोलणे टाळले. राजकारणात पद मिळाले असले तरी आपल्याला गृहित धरले जात असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. (लोकमत टीम) कऱ्हाडमध्ये महिला पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा कऱ्हाड पंचायत समितीत नागरिकांसाठी एक तक्रारपेटी होती़ तीही सध्या गायब आहे़ आता तर महिला सदस्यांना आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नाही म्हणून अश्रू ढाळत चक्क मासिक सभेत दाद मागायला लागतेय. त्यामुळे, ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी महिला सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा,’ असचं म्हणायची वेळ आलीय़ शुक्रवारच्या सभेत महिला सदस्यांवर आपल्या तक्रारींची तड लावली जात नाही म्हणून गहिवरण्याची वेळ आली; पण राजकारणात माहीर असणाऱ्यांनी वेळ मारून नेली. प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत़ त्यामुळे अनेक प्रश्नही अनुत्तरित राहतात़ पंचायत समिती सदस्यांचीच अशी ‘पंचाईत’ होत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल. याचा विचारच न केलेला बरा़ पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, तर सामान्यांच्या तक्रारींचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. उपसभापती म्हणून काम करत असताना मला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य मिळते. राजकारणासह प्रशासकीय कामात मला स्वातंत्र्य आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर त्याला विरोधही तेवढ्याच तत्परतेने करते. महिला पदाधिकारी म्हणून सक्षमपणे काम करीत आहे. - सारिका माने, उपसभापती, खंडाळा राजकारणात मला प्रथमच पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली. सभापती म्हणून काम करताना मला पूर्ण स्वातंत्र्य होते. महिला म्हणून इतर सदस्यांकडून कधी विनाकारण विरोध झाला नाही. माझे निर्णय मीच घेत असे. - दीपाली साळुंखे, माजी सभापती, खंडाळा सभासद म्हणून सभागृह चालवित असताना सर्व अधिकारी आणि सदस्यांना विचारात घेऊन काम करत आहे. त्यामुळे विरोध होत नाही. निर्णय घेताना, सभागृहात विचार मांडताना शिक्षणाचा खूप फायदा होतो. अधिकारी किंवा वरिष्ठांचा माझ्या कामात हस्तक्षेप कधीच नसतो. कोणतेही लोकाभिमुख काम करताना अधिकाऱ्यांचे नेहमीच सहकार्य मिळत असते. सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेते. लोकांनी ज्या विश्वासाने मला या पदावर बसविले आहे. ते काम माझ्याकडून पारदर्शकच होईल. - कविता चव्हाण, सभापती, सातारा. सुरूवातीला नवीन असल्याने काही सदस्यांना सभागृहातील कामकाजाची पूर्ण माहिती नव्हती. मात्र माहिती मिळाल्यावर सदस्या सभागृहात निर्भीडपणे बोलू लागल्या आहेत. वास्तविक सभागृहात मांडलेल्या प्रत्येक विषयाबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. काही वेळेला विषय मांडूनही केवळ पंचायत समितीला तोटा होईल, या भीतीपोटी ते विषय कार्यवाहीकरिता घेतले जात नाहीत. - रूपाली यादव, पंचायत समिती सदस्या, कऱ्हाड सभापती पदावर अडीच वर्षे काम करताना महिला म्हणून कधीच अडचण आली नाही. उलट पूर्ण स्वातंत्र्याने मी माझ्या अधिकारांचा वापर करून सभापती काळात अनेक समाजोपयोगी निर्णय घेऊन कामे केली. यापुढेही सदस्य म्हणून लोकांच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. - रूपाली वारागडे, सदस्य, मेढा अधिकाऱ्याने कामात कुचराई केली तर अधिकाराचा वापर करून शिस्त लावली जाते. सर्वांना विचारात घेऊनच कामे करत आहे. - मंगल जाधव, सभापती, महाबळेश्वर अगदी पहिल्यापासून केळघर विभागावर विकासकामांच्या बाबतीत अन्याय झाला आहे. उपसभापतीपदावर आता काम करताना प्रथम महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. मला अधिकाराचे स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून अधिकाराचा वापर करून काम करणार आहे. - निर्मला कासुर्डे, उपसभापती, मेढा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत किंवा दैनंदिन कामकाजात कोणताही राजकीय दबाव किंवा कोणाचा हस्तक्षेप नसतो. उपसभापती, गटविकास अधिकारी महिला असून सर्वांच्या सहकार्याने एक विचाराने कामकाज चालविले जाते. - उमा बुलुंगे, सभापती, वाई

Web Title: The management of the real work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.