पोलिसांच्या विधानसभा निवडणुकीतील मानधनाला ‘मुहूर्त’

By admin | Published: March 23, 2017 02:36 AM2017-03-23T02:36:40+5:302017-03-23T02:36:40+5:30

अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.

Manashankar's 'Muhurat' in the Vidhan Sabha Elections | पोलिसांच्या विधानसभा निवडणुकीतील मानधनाला ‘मुहूर्त’

पोलिसांच्या विधानसभा निवडणुकीतील मानधनाला ‘मुहूर्त’

Next

मुंबई : अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. त्यासाठी निश्चित केलेले पारिश्रमिक / मानधन देण्याला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या या निवडणुकीत राज्य पोलीस दलातील सात हजार अधिकारी/ कर्मचारी कार्यरत होते. त्यांना एकूण १० कोटी, ६१ लाख १७ हजार ६४५ रुपये मानधन मिळणार आहे. अडीच वर्षापासून पोलीस अधिकारी/ कर्मचारी या मोबदल्याच्या प्रतीक्षेत होते. राज्यातील २८७ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची
पूर्ण प्रक्रिया शांतता व सुरळीतपणे
पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय अन्य विभागाबरोबरच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचीही नियुक्ती केली होती. अन्य अधिकाऱ्यांप्रमाणेच पोलिसांनाही
या कामाचा विशेष मेहनताना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संबंधित घटकप्रमुखांकडून त्यांनी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष/ अपत्यक्षपणे केलेले कामाचे दिवसांचा तपशील निवडणूक अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार पाठवून देण्यात
आला होता. त्यासाठी एक महिन्याहून अधिक दिवस काम केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे मूळ वेतन व ग्रेड वेतन तसेच ३० दिवसाहून कमी
काम केलेल्यांना तितक्या दिवसांचा मानधनाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्याबाबतचा
प्रस्ताव पोलीस महासंचालकामार्फत गृह विभागात पाठविण्यात आला होता.
अखेर गृह विभागाने या रक्कमेला मंजुरी दिली आहे. राज्य पोलीस दलातील ६,९५५ अधिकारी व अंमलदार कार्यरत होते. त्याचे एकुण मानधन १० कोटी ६१ लाख १७ हजार ६४५ रुपये इतके होते. (प्रतिनिधी)

Web Title: Manashankar's 'Muhurat' in the Vidhan Sabha Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.