मंचर शहराचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Published: April 27, 2016 01:31 AM2016-04-27T01:31:18+5:302016-04-27T01:31:18+5:30

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीना यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली.

Manchar City will get water test | मंचर शहराचा पाणीप्रश्न सुटणार

मंचर शहराचा पाणीप्रश्न सुटणार

Next

मंचर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीना यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. ही पाणी योजना जलस्वराज टप्पा नं. २ मध्ये घेणेसाठी मीना यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.
मंचर शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योेजनेअंतर्गत ही सुधारित पाणीपुरवठा योजना होणार आहे.
या योजनेसाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी अर्थसंकल्पात २५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंचर शहरासाठी ही पाणी योजना जलस्वराज टप्पा नं. २ मध्ये घ्यावी, अशी विनंती आढळराव पाटील यांच्याकडे सरपंच दत्ता गांजाळे, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी केली होती. (वार्ताहर)

Web Title: Manchar City will get water test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.