मंदा म्हात्रे भाजपात
By admin | Published: June 24, 2014 12:36 AM2014-06-24T00:36:20+5:302014-06-24T00:36:20+5:30
राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला.
Next
>नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व आमदार विनोद तावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
आपणाला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू. नवी मुंबईतील घराणोशाही आणि भ्रष्टाचार उखडून टाकणो हे आता आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गो:हे यांनी आपली भेट घेऊन शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी मागील वर्षभरापासून चर्चा सुरू होती. त्यामुळे आज पक्षात प्रवेश केला, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईतील भाजपाच्या विखुरलेले कार्यकत्र्याना संघटित करून पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे मंत्री
भाजपाच्या संपर्कात
मुंबई : राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि नेते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. म्हात्रे यांना विधानसभेची उमेदवारी वा इतर कुठल्याही अटीवर प्रवेश दिलेला नाही, असे सांगत यापुढे भाजपात सरसकट प्रवेश दिला जाणार नाही. स्वच्छ प्रतिमा, जनमानसात प्रभावी असलेल्या लोकांनाच घेऊ. ज्या ठिकाणी भाजपाचे पक्षसंघटन आधीपासूनच मजबूत आहे तिथे बाहेरून कोणालाही पक्षात आणले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे एक कॅबिनेट मंत्री भाजपाच्या संपर्कात आहेत. आपल्यासह दोन्ही मुलांचे राजकीय पुनर्वसन होण्याची खात्री त्यांना भाजपाकडून हवी आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील एका माजी खासदार महिलेच्या मुलानेदेखील भाजपाशी संपर्क साधल्याचे समजते. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले घनश्याम शेलार यांना भाजपामध्ये आणण्याचे प्रय} होत आहेत.