पोपटराव पवार यांना मंडलिक स्मृती पुरस्कार
By admin | Published: October 4, 2016 06:41 PM2016-10-04T18:41:49+5:302016-10-04T18:41:49+5:30
सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अॅग्रिकल्चरल एज्युकेशन अॅँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा एक लाख रुपये रकमेचा लोकनेते सदाशिवराव मंडलिक
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.04 - सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अॅग्रिकल्चरल एज्युकेशन अॅँड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनच्या वतीने देण्यात येणारा एक लाख रुपये रकमेचा लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती राष्टÑीय पुरस्कार पोपटराव पवार यांना देण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील सहा मान्यवरांना २५ हजार रुपये रकमेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने शुक्रवारी (दि. ७) गौरविण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक व पुरस्कार समितीचे सदस्य भालबा विभूते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची सामाजिक व राजकीय वाटचाल संघर्षमय झाली आहे. त्यांच्या ८२ व्या जयंतीदिवशी विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण उल्लेखनीय काम करणाºयांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषी, शैक्षणिक, सिंचन, उद्योग क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे पोपटराव पवार (हिवरेबाजार) यांना राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक (पुणे), कोल्हापुरातील ज्येष्ठ उद्योजक परशुराम शंकरराव तथा बापू जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जी. डी. यादव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, जीवरक्षक दिनकर कांबळे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शुक्रवारी दुपारी एक वाजता सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, हमीदवाडा (ता. कागल) येथे लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्या हस्ते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारांचे वितरण होणार आहे.