आंब्याच्या झाडामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण; आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 12:07 IST2019-10-31T11:46:38+5:302019-10-31T12:07:25+5:30
पायटागावाच्या हद्दीत समोरून गाडी आल्याने ब्रेक दाबल्यानंतरं गाडी साइटपट्टीवर घसरून संरक्षक कठड्यांवर आदळून सुमारे २० फूट खोल दरीत कोसळून उलटली.

आंब्याच्या झाडामुळे वाचले ५० प्रवाशांचे प्राण; आंबेनळी घाटात बस दरीत कोसळली!
पोलादपूर : पोलादपूर -महाबळेश्वर सुरूर राज्य मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महाडकडे जाणाऱ्या अक्कलकोट -महाड बसला वळणावर दरीत कोसळून अपघात झाला. या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. यातील १८ हून अधिक प्रवासी जखमी झाले.
पायटागावाच्या हद्दीत समोरून गाडी आल्याने ब्रेक दाबल्यानंतरं गाडी साइटपट्टीवर घसरून संरक्षक कठड्यांवर आदळून सुमारे २० फूट खोल दरीत कोसळून उलटली. गाडी आंब्याच्या झाडाला अडकल्याने सर्वांचे प्राण वाचले. मात्र, बसमधील १८ हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
जखमीमध्ये गीता श्रीधर मठ्ठा (४४), प्रसाद निरंजन मिट्ट (१२, रा. सोलापूर), बाबाजी गंगाराम भांबर्गे (२८), सोनाबाई बाबू बर्गे (७०), संतोष रामू साने (६०), सुषमा आगेश गायकवाड (४०, सैनिक नगर), जनाबाई परशुराम पंडित (७४, रा.पुणे), अवधूत गोपीचंद अहिरे (३९,रा. सांगली), संदीप शिवराम रिंगे (लहुळसे), शिल्पा संदीप रिंगे, बसचालक प्रविण पोपट खरात, बहादूर रामसिंग दुबे, नेहा आदेश गायकवाड, सादिका खगैबी, खलील गैबी (महाड), ऋषीकेश शंकर पवार (२२), राहुल चंदू पवार आदी जखमी झाले आहेत. यातील दोघा जखमींना अधिक उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले आहे.