आंब्याच्या मोहापायी महिलेने गमावला जीव

By admin | Published: April 25, 2015 04:19 AM2015-04-25T04:19:36+5:302015-04-25T09:37:02+5:30

आंब्याच्या मोसमात आंबा खाण्याच्या हौसेला ४४ वर्षीय महिला आवर न घालू शकल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी कांजूरमध्ये

The mangoes of the Ambanis lost their lives | आंब्याच्या मोहापायी महिलेने गमावला जीव

आंब्याच्या मोहापायी महिलेने गमावला जीव

Next

मुंबई : आंब्याच्या मोसमात आंबा खाण्याच्या हौसेला ४४ वर्षीय महिला आवर न घालू शकल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी कांजूरमध्ये घडली. ही महिला आंबा खाण्यासाठी झाडावर चढली. आंबा तोडण्याच्या प्रयत्नात आंबा हातात न लागता तोल जाऊन ती पडली आणि या घटनेत या महिलेचा अंत झाला.
कांजूर येथील सीजीएस वसाहतीत तारुण हरिष मकवाना (४४) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. आंबा खाण्याच्या इच्छेला मकवाना स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. दुपारी एकच्या सुमारास घरामागे असलेल्या झाडाला लगडलेले आंबे त्यांनी पाहिले. लहान मुलांना झाडाखाली उभे करून त्या स्वत: झाडावर चढल्या. आंबा हाती न लागता पाय घसरून त्या इमारतीच्या आधार भिंतीवर कोसळल्या. तेव्हा आधार भिंतीवरील लोखंडी ग्रीलच्या सळ्यांमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची वर्दी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सळीतून मकवाना यांचा मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मकवाना यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांंच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कांजूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करीत अधिक तपास सुरू असल्याची माहिती कांजूर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The mangoes of the Ambanis lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.