अपयशाचे ‘माणिक’पर्व संपले !

By Admin | Published: March 3, 2015 02:30 AM2015-03-03T02:30:04+5:302015-03-03T02:30:04+5:30

सर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले.

'Manik' of failure is over! | अपयशाचे ‘माणिक’पर्व संपले !

अपयशाचे ‘माणिक’पर्व संपले !

googlenewsNext

पक्षाची दारुण स्थिती : नव्या प्रदेशाध्यक्षांकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा
अतुल कुलकर्णी - मुंबई
सर्वाधिक काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले माणिकराव ठाकरे अखेर पायउतार झाले आणि काँग्रेसमधील एक अपयशी ‘माणिकपर्व’ संपले. दीर्घकाळ या पदावर राहिलेल्या ठाकरे यांनी काँग्रेसच्या यशाचा आलेख उंचावता आले नाही, उलट त्यांच्या कारकिर्दीत पक्षाची वाताहातच झाली.
२१ आॅगस्ट २००८ रोजी माणिकराव प्रदेशाध्यक्ष झाले. जेव्हा त्यांनी सुत्रे हाती घेतली तेव्हा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस नंबर एकवर होता. आज तो अनेक ठिकाणी दोन किंवा तीन नंबरवर गेला आहे. त्यांच्या काळात सुरुवातीला पक्षाने विधानसभेत, लोकसभेत यश मिळवले मात्र पुढे याच यशाने पक्षीय पातळीवर वाढत गेलल्या गटबाजीमुळ ठराविक चार डोक्यांच्या पलिकडे पक्ष गेलाच नाही. मुंबई महापालिका, लोकसभेत पक्षाचा दारुण पराभव झाला. आपापल्या जिल्ह्यात ज्या नेत्यांनी पक्ष वाढवला, मोठा केला, व ज्यांच्याकडे ताकद होती अशांना संपविण्याचा प्रयत्न केला गेल्याची अनेक उदाहरणे देता येतील. टिळक भवनात त्यांच्या सभोवताली फिरणाऱ्यांचेच पक्षात वर्चस्व राहीले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्ष नेते अथवा स्थायी समितीच्या निवडी देखील स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता केवळ फॅक्सवर होऊ लागल्या. पक्ष पातळीवर एकूणच बेदिलीचे चित्र निर्माण झाले आणि पक्षांतर्गत नेमणुकांसाठी व्यवहार केले जातात असे जाहीरपणे बोलले जाऊ लागले.
एखादा नेता मोठा होतो हे लक्षात आले की त्याला अडचणीत कसे आणता येईल याची पक्षात जणू स्पर्धा लागली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने माणिकराव कधी कोणत्या माध्यमांवर पक्षाची बाजू जोरकसपणे मांडताना दिसले नाहीत. यांच्या काळात पक्ष लोकसभेत २ तर विधानसभेत ४२ जागांवर गेला. कार्यकर्त्यांची फळी मोडलेली आहे. उत्साह उरलेला नाही. मोठी मरगळ आहे. निवडणुका जवळ आल्या की पक्ष जवळ बोलावतो बाकी वेळेस विचारतही नाही ही भावना बळावली आहे. ़या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. हा सगळा इतिहास त्यांना चांगला ठावूक आहे. त्यामुळे पक्षाला ते नवसंजिवनी मिळवून देतील, अशी भावना काँग्रेसजन व्यक्त करत आहेत.

अशोक चव्हाण यांची कारकीर्द
जन्म : २८ आॅक्टोबर १९५८ (मुंबई)
शिक्षण : बीक़ॉम़, एम़बी़ए़ भवन्स कॉलेज, मुंबई़
१९८२ : प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस
१९८७ : लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी़
१९८९ : नांदेड लोकसभेत पराभव
१९९२ : राज्याच्या मंत्रिमंडळात नगरविकास व बांधकाम राज्यमंत्र्यांची जबाबदारी़
१९९२ : विधानपरिषदेवर निवड़
१९९९ : मुदखेड मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर व राज्याचे महसूलमंत्री पदाची जबाबदारी़
२००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहन व राजशिष्टाचार मंत्री़
२००४ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री़
२००८ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड़
२००९ : भोकर विधानसभा मतदारसंघातून एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी अन् दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी़
२०१० : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा़
२०१४ : नांदेड लोकसभेत ८२ हजारांच्या मताधिक्यांनी विजयी़
२०१५ : प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड़

नांदेडमध्ये जल्लोष : माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांची सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आला़ शहर व जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आतषबाजी करीत आनंद साजरा केला़ नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील आयटीआय चौक भागात आतषबाजी केली़ यावेळी ‘अशोकराव तुम आगे बढो़़़’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर लगेचच नवीन मोंढा भागातील काँग्रेस मुख्यालयासमोर आ़ डी़पी़सावंत यांच्या हस्ते आतषबाजी करण्यात आली़ यावेळी झालेल्या बैठकीत अशोकरावांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला़ यावेळी आ़ वसंत चव्हाण, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष बी़आरक़दम, आदींची उपस्थिती होती़

जन्माने बिहारी, कर्माने मराठीच - निरुपम
१मी जन्माने बिहारी असलो तरी कर्माने मराठीच आहे. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदावरील माझ्या नियुक्तीवरून मराठी-अमराठी असा वाद निर्माण करू नका, असे आवाहन काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले.
२नियुक्तीनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना निरुपम यांनी मराठी-अमराठी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुका मराठी-अमराठी मुद्द्यावर फिरण्याची शक्यता असताना मुंबईला निरुपम यांच्या रूपाने अमराठी अध्यक्ष देण्यात आला.
३त्याचा फटका पक्षाला बसल्याशिवाय राहणार नसल्याची टीका पक्षातून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तर यावरून थेट तोफ डागली. निरुपम यांनी मात्र कर्माने मराठीच असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नाइटलाइफच्या मुद्द्यावर निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. निवडणुकीपूर्वी युवकांना रोजगार, नोकरीचे दिलेले आश्वासन पूर्ण करता येत नसल्यानेच शिवसेनेने नाइटलाइफचा मुद्दा उचलला आहे. युवकांना नाइटलाइफ नाही, तर रोजगार हवा आहे.
 

 

Web Title: 'Manik' of failure is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.