माणिकरावांचा राजीनामा
By admin | Published: October 20, 2014 05:21 AM2014-10-20T05:21:38+5:302014-10-20T05:21:38+5:30
२००९च्या निवडणुकीत ८२ जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला आज दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्ष हादरला आहे.
Next
मुंबई : २००९च्या निवडणुकीत ८२ जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला आज दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्ष हादरला आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
ठाकरे यांनी आज दुपारीच पत्रपरिषद घेऊन आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला असून तो स्वीकारण्याची विनंती केली आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, १५ वर्षे राज्यातील जनतेने आम्हाला सत्तेचा कौल दिला, आता विरोधात बसण्याचा आदेश दिला असून तो आम्ही स्वीकारतो. (विशेष प्रतिनिधी)