Manisha Kayande : "आमची मशाल ही धगधगती आग, 40 मुंडक्यांच्या रावणाला पेटवल्याशिवाय राहणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:35 AM2022-10-12T10:35:30+5:302022-10-12T10:52:18+5:30

Manisha Kayande : "आम्हाला जी मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू. या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल" असंही म्हटलं आहे.

Manisha Kayande slams CM Eknath Shinde Over two sword shield symbols | Manisha Kayande : "आमची मशाल ही धगधगती आग, 40 मुंडक्यांच्या रावणाला पेटवल्याशिवाय राहणार नाही"

Manisha Kayande : "आमची मशाल ही धगधगती आग, 40 मुंडक्यांच्या रावणाला पेटवल्याशिवाय राहणार नाही"

googlenewsNext

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघर पोहोचविण्याठी या गटाच्या  राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"शिंदे गटाला काय चिन्ह मिळाले यावर बोलण्याची आवश्यकता नाही. आमची मशाल ही धगधगती आग आहे आणि 40 मुंडक्यांच्या रावणाला ही आग पेटवल्याशिवाय राहणार नाही" असं म्हणत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. "निवडणूक आयोगाने जे नाव आम्हाला दिले, तो अंतरिम निर्णय आहे. आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. दिवंगत रमेश लटके हे शिवसैनिक होते आणि जे सोडून गेले ते म्हणतात, आम्ही शिवसैनिक आहोत. मग एका जागेसाठी एवढा अट्टहास का?" असा सवाल मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाला विचारला आहे. 

"मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू"

"आम्हाला जी मशाल मिळाली आहे, ती घरोघरी पोहोचवण्याचे काम आम्ही करू. या पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल" असंही म्हटलं आहे. आपल्या घरात काही वाद झाला तर आपण काही घरदार सोडून जात नाही. ज्या बाळासाहेबांनी धनुष्यबाण चिन्ह ठरवलं ते तुम्ही गोठवण्याचा प्रयत्न केला, हे कोणालाही पटणारे नाही" असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: Manisha Kayande slams CM Eknath Shinde Over two sword shield symbols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.