मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांचे आरोपींना सहकार्य?

By admin | Published: July 6, 2017 04:31 AM2017-07-06T04:31:14+5:302017-07-06T04:31:14+5:30

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाच्या तपासासाठी कारागृहाच्या वतीने कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची नेमणूक

Manjula Shetti murder: co-operation with investigators accused? | मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांचे आरोपींना सहकार्य?

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण : तपास अधिकाऱ्यांचे आरोपींना सहकार्य?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाच्या तपासासाठी कारागृहाच्या वतीने कारागृह विभागाच्या पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कारागृहाच्या स्थितीचा आढावा घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली असताना, कारागृहाच्या व्हॉट्सप ग्रुपवर त्या स्वत: अन्य कर्मचाऱ्यांना आरोपींना सहकार्य करण्याची मागणी करत असल्याचा प्रताप त्यांच्याच ग्रुपमधील अधिकाऱ्याने चव्हाट्यावर आणला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी भायखळा कारागृहाच्या जेलर पीएसआय मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना अटक करण्यात आली असून त्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. या हत्याप्रकरण तसेच कारागृहातील दंगली प्रकरणी दोन सविस्तर गुन्हे नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या अधिक तपासासाठी कारागृहाच्या वतीने पोलीस उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांची राज्य महिला आयोगाने नेमणूक केली होती. तसेच राज्यभरातील महिला कैद्यांची काय परिस्थिती आहे? याचाही अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पण महाराष्ट्र कारागृहाच्या व्हॉट्सप ग्रुपवर त्या आरोपींना सहकार्य करण्याची मागणी करत आहेत.
याबाबत ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांचा हा प्रताप चव्हाट्यावर आणला आहे. याचा स्नॅप शॉटसहीत तक्रार अर्ज त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, साठे या अन्य कर्मचाऱ्यांना आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून आरोपींसाठी हजार आणि पाचशे रुपये गोळा करत असल्याची तक्रार त्यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांसह तुरुंग प्रधान सचिव आणि कारागहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी.के उपाध्यय यांना याबाबत तक्रार केली आहे. याबाबत स्वाती साठे यांच्यासह कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी. के. उपाध्यय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

काय म्हटले आहे ग्रुपवर

महाराष्ट्र कारागृहाच्या व्हॉट्साप ग्रुपवर, स्वाती साठे यांनी, ‘आपल्या सहाही कर्मचाऱ्यांना अटक झाली असून त्यांना ७ तारखेपर्यंतची कोठडी सुनावली आहे. आतातरी या माध्यमांचा आत्मा शांत होईल का?’ असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय यावर कोणी उत्तर दिले नाही म्हणून त्यांनी, आपण सगळे जेलकर्मीअधिकारी आणि कर्मचारी भक्कम आधार देऊ आपल्या भगिनींना, प्लीज हेल्प आॅल’ तसेच अरे इतक्या लोकांनी वाचले किमान येस तरी म्हणा...असा मेसेज त्यांनी ग्रुपवर केला आहे.

Web Title: Manjula Shetti murder: co-operation with investigators accused?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.