‘लोकमत’च्या शिरपेचात मानाचा तुरा
By admin | Published: September 19, 2014 03:28 AM2014-09-19T03:28:57+5:302014-09-19T03:28:57+5:30
चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’वर वाचकांनी दाखविलेल्या निरंतर विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे.
Next
आंतरराष्ट्रीय मोहोर : सिंगापूर येथील पॅन पॅॅसिफिकमध्ये ब्रँड लीडरशिप अवॉर्डने गौरव
मुंबई : चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या महाराष्ट्राचा मानबिंदू ‘लोकमत’वर वाचकांनी दाखविलेल्या निरंतर विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. सिंगापूर येथील पॅन पॅॅसिफिकमध्ये अलीकडेच पार पडलेल्या सोहळ्यात वर्ल्ड ब्रँड काँग्रेसच्या वतीने लोकमत समूहाला ब्रँड लीडरशिप अवॉर्डने गौरविण्यात आले.
महाराष्ट्रात आपले अव्वल स्थान अबाधित ठेवताना सामाजिक भान राखलेल्या लोकमतच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. समाजातील विविध आस्थापनांप्रमाणोच अनेकानेक सामाजिक संघटनांसोबत एक वर्तमानपत्र म्हणून जपलेल्या ऋणानुबंधांच्या निकषावर हा पुरस्कार देण्यात आला. वर्ल्ड ब्रॅण्ड काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेला हा पुरस्कार लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी स्वीकारला.
वाचकांशी नाते जोडतानाच सामाजिक भान राखत लोकमत समूहाने वर्षानुवर्षे समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. त्यातूनच वाचकांशी असलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी अधिक घट्ट केल्या आहेत. वर्ल्ड ब्रँड काँग्रेसने दिलेला ब्रँड लीडरशिप अवॉर्ड लोकमत समूहासाठी अभिमानास्पद आहे, अशी प्रतिक्रिया लोकमत समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी दिली.
ऋषी दर्डा यांना यंग अचिव्हर अवॉर्ड
परंपरागत शाश्वत मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची जोड देत महाराष्ट्रात अव्वल स्थान कायम राखण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांना यंग अचिव्हर अवॉर्डने गौरविण्यात आले.
सिंगापूर येथील पॅन पॅसिफिकमध्ये झालेल्या समारंभात सीएमओ एशियातर्फे दर्डा यांना हा पुरस्कार देण्यात आला. ऋषी दर्डा यांनी वृत्तपत्रत नावीन्यपूर्ण प्रयोग केले.
नॉलेज फोरम, सोशल फोरम, लोकमत अॅप, सोशल नेटवर्किग, ऑनलाईन आणि ई पेपर अशा विविध माध्यमांतून ‘लोकमत’ने नवतंत्रज्ञानाच्या साह्याने वाचकांर्पयत पोहोचण्याची कामगिरी पार पाडली आहे.
झपाटय़ाने होत असलेल्या नागरीकरणाच्या पाश्र्वभूमीवर आपले शहर आणि जिल्ह्याच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या व्यक्तींना ‘आयकॉन’, तर शूून्यातून विश्व निर्माण करत समाजासाठी झटणा:यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरविण्याचा पायंडा वर्तमानपत्रच्या क्षेत्रत ऋषी दर्डा यांच्या नेतृत्वाखाली लोकमतने घातला.
क्रीडा क्षेत्रत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाचे आयोजन करण्याचे योगदानही त्यांनी लोकमतच्या माध्यमातून दिले. या स्पर्धामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी एक नवा राजमार्ग मिळाला आहे.
ऋषी दर्डा यांना यंग अचिव्हर अवॉर्ड
परंपरागत शाश्वत मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची जोड देत महाराष्ट्रात अव्वल स्थान कायम राखण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांना यंग अचिव्हर अवॉर्डने गौरविण्यात आले.
सिंगापूर येथील पॅन पॅसिफिकमध्ये झालेल्या समारंभात सीएमओ एशियातर्फे दर्डा यांना हा पुरस्कार देण्यात आला. ऋषी दर्डा यांनी वृत्तपत्रत नावीन्यपूर्ण प्रयोग केले.