“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 12:21 PM2024-07-24T12:21:59+5:302024-07-24T12:22:03+5:30

Manoj Jarange Patil News: पुन्हा अटक वॉरंट का काढले? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

manoj jarange patil allegations on devendra fadnavis and criticized pravin darekar | “देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

“देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil News: ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी तसेच अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले होते. परंतु, मनोज जरांगे यांनी एक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑगस्टपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. मीडियाशी बोलताना आपल्या या निर्णयाविषयी मनोज जरांगे यांनी माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. 

रात्री माझी तब्येत खालावल्याने मराठा बांधवांना काळजी लागली होती. त्यामुळे ४० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला सलाईन दिली. त्यांची माया आहे म्हणून त्यांनी तसे केले. माझे कुणीही ऐकले नाही. आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि तुम्ही पण पाहिजे असे समाजाचे म्हणणे होते. आमरण उपोषणाच्या शक्तीला सरकार घाबरते. पण आता सलाईन लागल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग नाही. सलाईन लावून उपोषण करणारा माणूस नाही. त्यामुळे उपोषण स्थगित करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस भाजपाला लागलेली कीड

देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना समोर करून काड्या करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन-तीन जण भाजपला लागलेली कीड आहे. दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल. सरकारकडून कोणी आले नाही, कारण सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, पुन्हा अटक वॉरंट का काढले? न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठेच अडकत नाही, म्हणून हा कट आहे. पैसे दिले होते, त्या मॅटरमध्ये माझा चेक नाही. आम्ही सन्मान करतो म्हणून हुकूमशाही करता का, मी काय दहशतवादी आहे काय, अशी विचारणा जरांगे यांनी केली.
 

Web Title: manoj jarange patil allegations on devendra fadnavis and criticized pravin darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.