"मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:36 PM2024-08-10T13:36:43+5:302024-08-10T13:38:26+5:30

Nitesh Rane Criticize Manoj Jarange Patil: भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maratha Reservation) नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहेत. 

"Manoj Jarange Patil is the modern Mohammad Ali Jinnah, Narayan Rane when he was in twilight...", Nitesh Rane's scathing criticism | "मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

"मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे कुटुंबीय आमने सामने आले आहेत. मराठा आरक्षणावरूनभाजपा आणि भाजपा नेत्यांवर बोचरी टीका करत असलेल्या जरांगे पाटील यांना मराठवाड्यात येऊन उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जरांगे पाटील यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान, काल नारायण राणे यांनी नारायण राणेंनी टीका केल्यानंतर आता त्यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहेत. 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एक तरी मराठा समाजातील तरुणाचा फायदा झाला असेल तर त्याचा हिशोब आम्हाला द्यावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाचा फायदा अधिक झाला आहे. मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना असा प्रश्न घराघरांमधून विचारला जातोय. ते जेव्हा गोधडीत होते. तेव्हा नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. आम्हाला आव्हान आव्हान देऊ नका. तुमच्या शाळेचे नारायण राणे हे प्राध्यापक आहेत, असा टोला नितेश राणे यांनी दिला आहे. 

दरम्यान, शुक्रवारी सिंधुदुर्गामध्ये एका सभेला संबोधित करताना नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे म्हणाले होते की, मनोज जरांगे पाटील सोलापूरमध्ये मला उत्तर देताना म्हणाले, राणेसाहेब मराठवाड्यात येताहेत तर येऊ दे. आमच्याकडे काय बघणार? आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं आहे काय? असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी विचारला. आतापर्यंत मागच्या ४०० वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता. 
  

Web Title: "Manoj Jarange Patil is the modern Mohammad Ali Jinnah, Narayan Rane when he was in twilight...", Nitesh Rane's scathing criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.