“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:51 AM2023-11-10T11:51:52+5:302023-11-10T11:54:34+5:30

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मनुष्यबळ वाढवा, २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

manoj jarange patil make clear that give maratha reservation in obc | “आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

“आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी अशी विनंती आहे. उपोषण सोडताना जे ठरले होते त्याबाबत अजून सरकारने Time Bond दिला नाही, तो तातडीने द्यावा. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका. ओबीसीमध्ये आमचे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावे. त्यामुळे ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही. ठरल्याप्रमाणे Time Bond तातडीने द्यावा. मनुष्यबळ वाढवा २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्याव यावर ठाम आहोत. आम्हाला गाजर दाखवू नका. मुख्यमंत्र्यांनी, लिखित ठरलय तसा टाईमबाँड द्यावा. EWS मध्ये मराठा समाजाला ८.३० टक्के आरक्षण मिळू शकते. तेच OBC मध्ये फक्त ३.५० टक्के आरक्षण मिळेल. म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणाचा लाभ कमी होईल, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. 

मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे

या प्रश्नावर उत्तर देताना, ओबीसीत लाभ कमी होणार असे नाही. आमचे पूर्वीपासून, आमचे गिळलेले आहे, ते बाहेर काढायचे आहे. मराठा समाज ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. काही कमी होणार नाही. आरक्षण कमी मिळणार नाही. ओबीसीत नोंदी सापडतील, त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकट आरक्षण द्यावे ही मागणी आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, सरकारबाबत मी सॉफ्ट नाही. आम्हाला OBC मध्ये घ्या आणि तुम्ही ७५ चे ९० टक्के आरक्षण करा. काही अडचण नाही. सरकारने नोंदी शोधण्यात निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल. खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: manoj jarange patil make clear that give maratha reservation in obc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.