"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 01:50 PM2024-09-17T13:50:42+5:302024-09-17T13:51:13+5:30

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांच्या सहाव्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस. तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील  

Manoj Jarange Patil News: "I have started a dangerous journey, you didn't give reservation..."; Manoj Jarange's warning to Eknath Shinde government maratha reservation agitation | "मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क 

वडीगोद्री : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. 2024 ला तुमचा भुगा करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.

अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली असून सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्याना ओबीसी तून आरक्षण मिळावे या मागणी साठी त्यांचे हे मुक्ती संग्राम दिनी सहावे उपोषण आहे. 

आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, महायुती असो महाविकास आघाडी असो तिकडे खड्ड्यात जा; पडा नाहीतर निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा, आम्हाला काहीही देणेघेणे नाही. सरकारशी बोलण्यासाठी त्यांनी यावे म्हणून आंदोलन नाही करत केव्हाच आपल्या ताकदीवर आणि समाजावर विश्वास आहे. मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही, फडणवीस साहेब म्हणतात ना राजकीय भाषा बोलतात. काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील. तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो ना कोणी फायदा केला तर आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आम्ही फडणवीस यांना संधी दिली, असे जरांगे म्हणाले. 

तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. आमच्या सगळ्या मागण्या सगळ्यांच्या पाठ झाल्या आहेत. मला माझा समाज सांगतो की आता उपोषण नाही करायचे. तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणाला उभे करायचे. माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही आम्हाला काही गरज नाही, असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका 

मला राजकीय बोलायचे नाही. मी आता राजकीय भाषा बोलणार नाही. फडणवीस साहेबांना संधी दिली. माकडचाळे करण्यापेक्षा, चोरटे पुढे घालण्यापेक्षा यांनी तिकडे ताकद लावायची. आता त्यांनी (राजेंद्र राऊत) फडणवीस साहेबांना सांगायचे की तो गप बसलाय राजकीय भाषा बोलत नाही. त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेबांना ही संधी आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मला समोरून कितीही बोलले तरी मी राजकीय भाषा बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.

अंबडचे तहसीलदार यांनी घेतली भेट

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावर बोलतांना जरांगे म्हणाले त्यांच्या हातात काही नाही. त्यांना दोष देऊन फायदा नाही. ते बिचारे अधिकारी आहेत. त्यांचे काम करत आहेत. याच्यात मुख्य फडणवीस साहेब, मंत्र्यांना आमदारांना काम करून देत नाहीत. मराठा समाजाला साक्षी ठेवून फडणवीस यांना एक संधी दिली. आरक्षण नाही दिले तर दोषी फडणवीस साहेब, जाणून-बुजून मराठ्यांचा वाटोळ करायला निघाला, अशी टीका जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Web Title: Manoj Jarange Patil News: "I have started a dangerous journey, you didn't give reservation..."; Manoj Jarange's warning to Eknath Shinde government maratha reservation agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.