"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 04:41 PM2024-06-22T16:41:25+5:302024-06-22T16:42:13+5:30

ओबीसी समाजाच्या उपोषणावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि सरकारवर निशाणा साधला आहे. 

Manoj Jarange Patil warning to Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis over Maratha - OBC Reservation controversy | "सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

"सगळे ओबीसी एकवटले तरी..."; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीस-छगन भुजबळांना इशारा

छत्रपती संभाजीनगर - मराठ्यांची धनगर बांधवांवर नाराजी ओढवून घ्यायला लागलाय, धनगर बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. आमच्या नोंदी खऱ्या आहेत. आमची नोंद असून, ओबीसी आरक्षणात असून देऊ नका म्हणणं ही कोणती माणुसकी? तुमचं आरक्षण बोगस, मराठे रस्त्यावर येतील. छगन भुजबळांचं ऐकून मराठ्यांचे वाटोळं होऊन देणार नाही. मराठ्यांचे मतदान निर्णायक करा. सगळे साफ होऊन द्या. जर एकही नोंद रद्द केली तर इथून पुढचे आंदोलन मंडल कमिशन रद्द करा हे असेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा कुणी करत असेल तर मराठ्यांनीच उत्तर द्यावे. मराठ्यांना आरक्षण मिळायला नको असं मराठा नेत्यांना वाटते का? मराठ्यांबद्दल इतका राग का? आरक्षणासाठी टोकाला जायची त्यांची भूमिका आहे मग आरक्षण किती मोठे हे कळत नाही का? संविधानाच्या गप्पा करतायेत. हे संविधानाचे आंदोलन आहे का? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा. मराठ्यांचे मतदान गोड बोलून घेत होते त्यांचे खरे चेहरे आता बाहेर आले. मराठ्यांच्या नेत्यांनी शहाणे व्हावे. आपणच एकटे ५०-५५ टक्के आहोत हे काही करू शकत नाही. आमचा नाईलाज आहे. मराठ्यांच्या अंगावर कोणी आले तर आम्हीही रस्त्यावर उतरू. हे सरकारला चॅलेंज आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आमचं आरक्षण २०० वर्षापूर्वीचे आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा संबंध नाही. आम्ही शांततेत ऐकून घेतो, उपोषण सुरू असताना दुसरं उपोषण बसवतो, दंगली घडवण्यासाठी? स्वत:ला जातीवादी नाही म्हणायचे आणि आता उघड पाठिंबा द्यायला लागले. गिरीश महाजन, अतुल सावे मराठ्यांचे मतदान घेत नाहीत का? मराठ्यांचा मुडदा पाडू देणार नाही. संविधानाच्या पदावर हे बसलेत. आपल्या पोरांवर केसेस करायला लावतात. सरकारने कुणबी नोंदी थांबवल्यात. १८७१ ची जनगणना माझ्याकडे आली. ब्रिटीशकालीन नोंदी आहे. तुम्ही फुकट खाता, कारखाने आम्हाला काय करायचे, तुम्ही घेऊन टाका. बाकीच्या नेत्यांना मी दोष देत नाही. छगन भुजबळ एकटाच राज्यातील वातावरण बिघडवत आहे. आम्ही बसल्यावर जातीय तेढ निर्माण होतो, आमच्या रस्त्यात बसवून त्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली जाते. आम्हाला परवानगी नाकारली तसं या लोकांना उपोषणाला परवानगी का नाकारली नाही. आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ झाला मग ते बसल्यावर जातीय तेढ निर्माण झाला नाही का? हे सर्व छगन भुजबळ करतोय असा आरोप जरांगेंनी केला. 

दरम्यान, ओबीसीची मोट बांधून मराठ्यांवर अन्याय करतात, मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पान हलू शकणार नाही. तुम्ही मराठ्यांचा अपमान करताय. आमच्या अंगावर त्यांना घालताय. ओबीसीचा मोट बांधण्याचा डाव असला तरी मनोज जरांगे हा डाव होऊ देणार नाही. मराठा एकत्र आहेत. तुमच्या पक्षातील मराठा नेतेही सहन करू शकत नाही. डोळ्यासमोरील अन्याय सहन करणाऱ्या मराठा नेत्यांसोबतही जनता राहणार नाही. ओबीसीची मोट बांधण्याचा प्रयत्न करू नका हे देवेंद्र फडणवीसांना सांगतो. हे राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, तुमचा हा डाव मी हाणून पाडेन, सगळे ओबीसी एक झाले तरी मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, १३ तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण आम्ही घेणारच असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांना दिला. 

मंडल कमिशन रद्द करा म्हणून आंदोलन उभारू

मराठ्यांनी एक राहायचे, जीव गेला तरी मी हटणार नाही. मला दिसेल तिथे गोळ्या झाडायचा हा देखील यांचा प्लॅन असणार आहे. माझ्यामागे अनेक षडयंत्र, मी लढायला खंबीर आहे. मराठ्यांनी फक्त एकत्र राहावे. संविधानाच्या पदावर बसणारे रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. मराठ्यांनीही भुजबळांना मते दिलीत. फडणवीसांनी षडयंत्र हाणून पाडावे. १३ तारखेपर्यंत आम्ही विश्वास ठेवू, आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार, एकही नोंद रद्द होऊ देणार नाही. जर एकही नोंद रद्द झाली तर मंडल कमिशन रद्द करा यासाठी आंदोलन असेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 
 

Web Title: Manoj Jarange Patil warning to Chhagan Bhujbal, Devendra Fadnavis over Maratha - OBC Reservation controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.