"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 02:38 PM2024-10-12T14:38:02+5:302024-10-12T15:03:14+5:30

Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil's warning to the government, "Take a decision on reservation until the code of conduct is in place, otherwise..." | "आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

आज बीड जिल्ह्यातील नारायणगड येते झालेल्या दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यातील महायुती सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. पण सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही. आता सरकारला सुट्टी नाही. सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करेन. तेव्हा मी जे सांगेन ते तुम्ही ऐकायचं, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित मराठा समाजाला केले.

यावेळी उपस्थित मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, या ताकदीनं आपण एकत्र येणार असं वाटलं नव्हतं. दु:खातून सुखाकडे जायचं आहे. या समुदायावर संस्कार आहेत, त्यामुळे हा समुदाय कधीच जातीयवाद करू शकत नाही. संपूर्ण राज्यभर पसरलाय. पण कधी मस्तीत आणि मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायानं केलंय. यांनी कधी जातीयवाद केला नाही आणि जात यांना कधी शिवली पण नाही.  एवढा जनसमुदाय पहिल्यांदाच बघतोय. काय बोलावं ते सूचत नाही आहे.  एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आलाय की की, तुमच्या चरणावर खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडाने राज्याला देशाला दिलीय. या गडाच्या आशीर्वाद ज्याच्या पाठीवर पडतो तो दिल्लीसुद्धा वाकवतो, असे जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आरक्षणाच्या मागणीसाठी मागच्या १४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने एकही मागणी मान्य केली नाही. माझं सरकारला एकचं सांगणं आहे. सरकार, ओय सरकार, आता तुम्हाला सुट्टी नाही. आचारसंहिता लागण्याआधी जनतेचे सर्व प्रश्न सोडवायचे. मात्र तसं झालं नाही तर आचारसंहिता लागल्यानंतर मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. हे काय करताहेत हे सगळं बघायचं. त्यांच सगळं करून झाल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. नंतर सगळं गणित उलटं करून टाकायचं. 

एक गोष्ट लक्षात असू द्या, शेवटी आपल्यापुढे पर्याय नाहीये. मी माझी मुख्य भूमिका आचारसंहिता लागल्यानंतर सांगणार आहे. तुम्हा सगळ्यांना मान्य आहे ना. यांनी आपल्याला फसवलंय. त्यामुळे आता आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची.  जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी आचारसंहिता लागेपर्यंत करतात का हे पाहायचं. मात्र असं झालं नाही तर यांच्या नाकावर टिच्चून यांना उलथं केल्याशिवाय मागे हटणार, असा इशाराच जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. तसेच ‘’तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला संपवल्याशिवाय मागे हटणार नाही’’, असं आश्वासनही त्यांनी मराठा समाजाला दिलं. 

Web Title: Manoj Jarange Patil's warning to the government, "Take a decision on reservation until the code of conduct is in place, otherwise..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.