मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 05:47 AM2023-12-29T05:47:26+5:302023-12-29T05:47:34+5:30

समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.

manoj jarange route to mumbai get fixed maratha reservation dindi will go through 6 districts | मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी

मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी २० जानेवारी रोजी मुंबईला जाण्याचा मार्ग (रूट) मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. 

प्रवासाला किती दिवस लागतील, या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे-पाटील म्हणाले की, आम्हाला काही विशिष्ट तारखेस मुंबईला पोहोचायचे नाही, यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईत जाणारच आहोत. प्रत्येक तुकडीचे स्वतंत्र नियोजन आहे.

असा असेल मार्ग 

२० जानेवारी रोजी सराटी (जि. जालना) येथून मुंबईचा प्रवास सुरू होईल. शहागड, गेवराई पाडळसिंग, पाथर्डी, तीसगाव, करंजी फाटा, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, वाघोली, पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी, मुंबईतील आझाद मैदान. 

अशी असेल व्यवस्था

यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी आणि छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर सोबत घ्यावे, जेथे रस्त्यात थांबाल तेथेच आपला स्वयंपाक करून खायचा आहे.
 

Web Title: manoj jarange route to mumbai get fixed maratha reservation dindi will go through 6 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.