“२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:36 PM2023-11-16T12:36:49+5:302023-11-16T12:37:11+5:30

Manoj Jarange Patil: सरकारवर आमचा विश्वास आहे, पण वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

manoj jarange said government would not get a single day after 24 december and next move will be in mumbai | “२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

“२४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही, पुढील आंदोलन मुंबईत असेल”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा सुरू झालेल्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी उत्साहात मनोज जरांगे यांचे स्वागत केले जात आहेत. २४ डिसेंबरनंतर एकही दिवस सरकारला मिळणार नाही. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सगळ्याच सरकारने आमच्या लेकरांचे आतापर्यंत वाटोळे केले आहे. मराठा समाजासंदर्भातील पुरावे लपवलेले आहेत. पण लपवलेले पुरावे आता बाहेर येत आहे. म्हणून सरकार घाबरले आहे. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा २४ डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे. आमच्या रात्रीच्या सभाही हाऊसफुल्ल होताय. रात्रंदिवस जागून आम्ही आशीर्वाद घेतोय. मराठा गाठीभेटीसाठी हा दौरा आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. 

वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत

२४ डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारला कायदा पारीत करावा लागत असेल तर त्याला आधार पाहिजे आणि आता कुणबी नोंदी लाखांत सापडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही. सरकारवर माझा विश्वास आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात रोष नाही. फक्त दोन-चार जणांचा हा विषय आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत असल्यामुळे मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. सामान्य ओबीसींच्या लक्षात आले आहे की, मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना दिले पाहिजे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दोन-चार जणांची खटपट सुरू आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. 
 

Web Title: manoj jarange said government would not get a single day after 24 december and next move will be in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.