मनोज म्हात्रे हत्या प्रकरणी दोघांना अटक, कौटुंबिक वैमनस्यातून हत्या
By admin | Published: February 19, 2017 10:26 AM2017-02-19T10:26:38+5:302017-02-19T10:26:38+5:30
काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी महेश पंडित म्हात्रे आणि मयूर म्हात्रे उर्फ प्रकाश म्हात्रे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 19 - काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी महेश पंडित म्हात्रे आणि मयूर म्हात्रे उर्फ प्रकाश म्हात्रे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.
भिवंडीत महानगरपालिकेतील नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे (५३) यांची मंगळवारी रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवालवाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला होता. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. म्हात्रेंवर हल्ला केल्यानंतर दोन्हीही हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, अखेर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. दरम्यान म्हात्रेंची हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे, तर कौटुंबिक कारणातूनच झाल्याचं समोर आलं आहे.
मनोज म्हात्रे हे 2002 पासून नगरसेवक असून त्यांनी दोनवेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात.