मनोज म्हात्रेंच्या अंगरक्षकाला अटक

By admin | Published: February 25, 2017 11:22 PM2017-02-25T23:22:20+5:302017-02-25T23:22:20+5:30

भिवंडी महापालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केल्याने कथित आरोपींची संख्या आता तीन झाली

Manoj Mhatre's bodyguard arrested | मनोज म्हात्रेंच्या अंगरक्षकाला अटक

मनोज म्हात्रेंच्या अंगरक्षकाला अटक

Next

ठाणे : भिवंडी महापालिकेचे काँग्रेस गटनेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केल्याने कथित आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. तर अटक केलेला जिग्नेश अरविंद पटेल हा म्हात्रे यांचा अंगरक्षक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या हत्येसाठी मारेकऱ्यांना लाखो रुपये मिळणार असल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
मनोज म्हात्रे यांची हत्या त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याने केली असण्याची शक्यता वर्तवली जात असताना, या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, ते अद्याप मुख्य आरोपींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यातच राजकीय हस्तक्षेपाने पोलिसांवर दबाव वाढल्याने या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.
या पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांच्या पथकाने तपास करताना, तांत्रिक माहितीच्या आधारावर जिग्नेश पटेल याला ताब्यात घेतले. त्या वेळी तो मनोज म्हात्रे यांचा अंगरक्षक असल्याची बाब पुढे आली. तसेच हत्येचा कट शिजताना, जिग्नेश हा मारेकऱ्यांसोबत असल्याचे पुढे आले. तसेच हत्येच्या दिवशी जिग्नेशने सहा तास आधी मारेकऱ्यांसोबत दारू आणि जेवणही केले होते. तसेच म्हात्रे यांची हत्या झाली त्या वेळी मागील १० ते १२ वर्षांपासून अंगरक्षक असलेला जिग्नेश हा त्यांच्यासोबत असणे आवश्यक होते. मात्र, तो म्हात्रेंसोबत नसताना प्राणघातक हल्ला झाला. तसेच त्यानेच मारेकऱ्यांना म्हात्रे यांच्याबाबत माहिती दिली असून त्याबदल्यात त्याला मोठा मोबदला मिळणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतल्यावर मारेकऱ्यांच्या मागावर पथक दमणला पोहोचले खरे, पण मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच त्यांनी तेथून पळ काढला. तर या हत्येत १० ते १२ जण असण्याची शक्यता असून ही हत्या नियोजन करून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (प्रतिनिधी)

अटक केलेला जिग्नेश हा म्हात्रे यांचा अंगरक्षक असून या हत्येबाबत त्याला माहिती असल्याचे पुढे आले आहे. तसेच त्याला न्यायालयाने १० दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
- पराग मनेरे, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

Web Title: Manoj Mhatre's bodyguard arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.