आमदार निवासात भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’; काम न करताच बिले, २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये काम दाखवून लूट

By यदू जोशी | Published: November 11, 2017 05:53 AM2017-11-11T05:53:12+5:302017-11-11T05:55:22+5:30

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने

'Manora' of corruption in the residence of the MLA; Bills without work, plundering work in 28 MLA rooms | आमदार निवासात भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’; काम न करताच बिले, २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये काम दाखवून लूट

आमदार निवासात भ्रष्टाचाराचा ‘मनोरा’; काम न करताच बिले, २८ आमदारांच्या खोल्यांमध्ये काम दाखवून लूट

Next

मुंबई : मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले ‘मनोरा’ आमदार निवास आणि ‘आकाशवाणी’ आमदार निवासात ३ कोटी रुपयांहून अधिकची देखभाल, दुरुस्तीची कामे न करताच अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमताने पैसा लाटल्याचा आरोप करणारे पत्र भाजपाच्याच एका आमदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दहा आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच लाखो रुपये उकळण्यात आल्याचे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी यांनी म्हटले असून त्यांनी केलेल्या चौकशीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, उपअभियंता भूषणकुमार फेगडे आणि शाखा अभियंता धोंडगे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यातील फेगडे व धोंडगे यांना निलंबित करण्यात आले आहे. वाळके यांची केवळ बदली करण्यात आली आहे. चौकशीमध्ये भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही अद्याप अधिकारी वा कंत्राटदारांविरुद्ध बांधकाम विभागामार्फत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
आता या दहा व्यतिरिक्त आणखी १८ आमदारांच्या खोल्यांमध्ये कोणतेही काम न करता कंत्राटदारांना पैसा देण्यात आल्याचे पत्र आमदार चरणदास वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना आकडेवारीसह दिले आहे. या प्रकरणाची चौकशी आता बांधकाम विभागाच्या दक्षता पथक मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याकडे देण्यात आली आहे. बहुतेक प्रकरणात निविदा काढून तीन महिन्यांच्या आत कामे झाल्याचे दाखवत कंत्राटदारांना बिलेदेखील अदा करण्यात आली.


Web Title: 'Manora' of corruption in the residence of the MLA; Bills without work, plundering work in 28 MLA rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.