'सामना' जाळू म्हणणारे मनोरुग्ण - उद्धव ठाकरे

By admin | Published: June 27, 2016 08:31 AM2016-06-27T08:31:36+5:302016-06-27T08:31:36+5:30

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात कोणाचेही नाव न घेता सामना जाळू म्हणणा-यांना मनोरुग्ण ठरवले आहे.

Manoragus who say 'face' burns - Uddhav Thackeray | 'सामना' जाळू म्हणणारे मनोरुग्ण - उद्धव ठाकरे

'सामना' जाळू म्हणणारे मनोरुग्ण - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २७ - जर शिवसेना आमचे साहित्य जाळत असेल तर शिवसेनेनं सुद्धा त्यांच्या प्रकाशनांच्या जाळपोळीसाठी तयार राहावं असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून जोरदार उत्तर दिलं आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात कोणाचेही नाव न घेता सामना जाळू म्हणणा-यांना मनोरुग्ण ठरवले आहे. 
 
आतापर्यंत पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
 
आणखी वाचा
....मग आम्हीही तुमचे साहित्य जाळू, शेलारांचा सेनेला इशारा
 
शिवसेना सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे व ‘सामना’चे तेजही त्याच बरोबरीने वाढत आहे. शिवसेना व ‘सामना’ एकमेकांना पूरक आहेत व त्यांच्याशी बरोबरी कधीच कोणी करू शकले नाही ही अनेकांची पोटदुखी आहेच. गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीश्‍वरांच्या ‘फुस’खोरीने व येथील थैलीवाल्यांच्या मदतीने अनेकांनी शिवसेना संपविण्याचे विडे उचलले, पण ते अफझलखान, शाहिस्तेखानाप्रमाणे आडवेच झाले. हा इतिहास ज्यांना माहीत नाही असे मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत अशी बोच-या शब्दात भाजपवर टीका करण्यात आली आहे. 
 
हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्‍या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला, हिंदुत्वाला अग्नी देण्याचीच ही भाषा आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.
 
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात 
- महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. टीकाटिपणी करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण सत्य सांगणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढू लागले आहेत. यालाच सत्ता डोक्यात जाणे असे म्हणतात. मानेवरचे मडके रिकामे असले की अशी हवा त्या पोकळीत शिरते व मग शब्दांऐवजी थुंकण्याचे प्रकार वाढतात. सूर्यावर थुंकण्याचे बालीश प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहेत. थुंकणार्‍याच्या थोबाडावर ती थुंकी पडते व सूर्याचे तेज मात्र वाढतच जाते असे महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो. शिवसेना सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे व ‘सामना’चे तेजही त्याच बरोबरीने वाढत आहे. शिवसेना व ‘सामना’ एकमेकांना पूरक आहेत व त्यांच्याशी बरोबरी कधीच कोणी करू शकले नाही ही अनेकांची पोटदुखी आहेच. गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीश्‍वरांच्या ‘फुस’खोरीने व येथील थैलीवाल्यांच्या मदतीने अनेकांनी शिवसेना संपविण्याचे विडे उचलले, पण ते अफझलखान, शाहिस्तेखानाप्रमाणे आडवेच झाले. हा इतिहास ज्यांना माहीत नाही असे मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत. ‘सामना’ जाळू असे मनोगतही यापैकी काही मनोरुग्णांनी व्यक्त केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अग्निशमन दले सज्ज झाल्याच्या अफवा पसरवल्या आहेत.
 
- ‘सामना’ हा एक विचार आहे. कागद जळतो, विचार जळत नाही. ‘सामना’ जाळण्याचा विचार करणे म्हणजे ‘हिंदुत्व’ जाळणे. प्रखर राष्ट्रवाद, प्रभू श्रीराम, काशी, मथुरा आणि राष्ट्राची अस्मिता जाळणे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य व संविधान जाळणे. पण मनोरुग्णांना हे सर्व सांगायचे कोणी? मुंबईत बसून पिचलेल्या छातीत गॅसची हवा भरण्याने छाती फुगण्याऐवजी फुटू शकते याचे भान छाती फुगवणार्‍यांनी ठेवायला हवे. छाती पुढेच काढायची असेल तर कश्मीर खोर्‍यात जाऊन काढा. पाकव्याप्त कश्मीरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जाळा. कश्मीरात कालच पाकड्यांच्या लश्कर-ए-तोयबाने भयंकर दहशतवादी हल्ला घडवून आठ जवानांची हत्या केली. म्हणजे हे जवान शहीद झाले. कश्मीरात असे दहशतवादी हल्ले वारंवार होत आहेत व आमचे जवान शहीद होत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी इथे मुंबईत बसून दंडावरील बेडक्या फुगवण्यापेक्षा कश्मीरात जाऊन दम दाखवायला हवा अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली तर काय चुकले? हिंदुस्थानभर जिहादी हल्ले करून विध्वंस करण्याचे ‘मनोगत’ पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी व्यक्त केले आहे व त्या मनोगतासमोर शेपट्या घालून इकडे छात्या फुगवून दाखवल्या जात असतील तर ते देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. 
 
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामात हे अशा प्रकारे अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रउभारणीचा जो विडा उचलला आहे त्या विड्यात शेंदूर कालवण्याचा हा प्रकार त्यांचेच लोक करीत असतील तर या अस्तनीतल्या दलालांना (निखार्‍यांचा अपमान नको) मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्‍वास आहे. त्यांनी भ्रष्टाचार मोडण्याचे व गुन्हेगारी संपविण्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे स्वपक्षातील काही फडतूस लोकांचे धाबे दणाणल्याने मानसिक आजार बळावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाही सुरुंग लावण्याचे हे कारस्थान आहे. अर्ध्या महाराष्ट्रात आजही दुष्काळ व आत्महत्यांचे लोण आहे. चुली विझल्याच आहेत. त्या चुली पेटविण्याचे सोडून हे फडतूस लोक जाळपोळीची तोंडपाटीलकी करतात. हे मानसिक आजाराचे टोक आहे. ब्लॅकमेलिंग, दलाली, स्वैराचाराचे राजकीय कवच मिळवून ज्यांनी अंबारीत बसल्याचा आव आणला ते प्रत्यक्षात खेचरांवर किंवा गाढवांवरच बसले आहेत, पण मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येईल असे वाटत नाही. ही स्वत:ची धिंडच आहे. हा मुख्यमंत्र्यांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. 
 
- हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्‍या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला, हिंदुत्वाला अग्नी देण्याचीच ही भाषा आहे. आतापर्यंत पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत. 

Web Title: Manoragus who say 'face' burns - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.