मनोरुग्ण महिलेचा धुमाकूळ

By admin | Published: October 21, 2014 01:08 PM2014-10-21T13:08:50+5:302014-10-21T13:08:50+5:30

गोलाणी मार्केटमधील तळ मजल्यावर असलेल्या पल्लवी ऑप्टीकल्समध्ये सोमवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय मनोरुग्ण महिलेने चांगलाच धुमाकूळ घातला.

Manorganj woman suffocated | मनोरुग्ण महिलेचा धुमाकूळ

मनोरुग्ण महिलेचा धुमाकूळ

Next

 

जळगाव : गोलाणी मार्केटमधील तळ मजल्यावर असलेल्या पल्लवी ऑप्टीकल्समध्ये सोमवारी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास एका ३0 वर्षीय मनोरुग्ण महिलेने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे पोलीस चांगलेच बेजार झाले. मात्र ती महिला स्वत:हून दुकानातून बाहेर पडताना तिला मोबाईलच्या कॅमेर्‍यात अनेकांनी टिपण्याचा प्रयत्न करून स्वत:ची 'मनोनग्नता' दाखविली. त्यामुळे खरे मनोरुग्ण कोण? असा प्रश्न या प्रसंगाच्या निमित्ताने उपस्थित झाला.
गोलाणी मार्केटमधील ३१0 ग्राऊंड प्लोअरला जितेंद्र महाजन यांचे पल्लवी ऑप्टीकल्स हे दुकान आहे. दुपारी ३.३0 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होती. दरम्यान ३.४५ वाजेच्या सुमारास एक महिला त्यांच्या दुकानात शिरली. तेव्हा ती ग्राहक असावी, असे महाजन यांना वाटले. मात्र नंतर काळजीपूर्वक तिला बघितले असता ती मनोरुग्ण असल्याचा महाजन यांना संशय आला. तिला हटकण्याच्या आतच ती तळमजल्यात गेली. तळमजल्यातील खुर्चीवर जाऊन बसली. त्या महिलेने स्वत:च्या अंगावरील कपडेही काढून टाकले होते. दरम्यान तिने तळमजल्यातील दिवे व इतर साहित्याचीही फेकाफेक केली. हा प्रकार बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात दुकानासमोर गर्दी केली होती. तासभर ती महिला तळमजल्यात बसलेली होती. 
याबाबत कुणीतरी शहर पोलिसांना कळविले. त्यानंतर तेथे चार पोलीस दाखल झाले. मात्र हा प्रकार बघण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढतच गेली. दुकानासमोरील रस्त्यावर ट्रॅफीक ज्ॉम झाली. त्यामुळे पुन्हा एका महिला कर्मचार्‍यासह सहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण त्या महिलेला बाहेर काढण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. महिला पोलीस कर्मचारी तळमजल्यात प्रवेश करायला लागली. मात्र त्या मनोरुग्ण महिलेचा 'अवतार' बघून त्या घाबरून परत आल्या. त्यानंतर परिसरातील तीन-चार महिलांनीही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुध्दा अयशस्वी झाला. तासाभरानंतर ती तळमजल्याबाहेर यायला लागली. त्यावेळी पोलिसांनी दुकानाचे शटर बंद केले. ती व्यवस्थित असल्याची महिला पोलिसांनी खात्री केल्यानंतर शटर उघडण्यात आले. मात्र ती मनोरुग्ण महिला दुकानाबाहेर पडत असताना अनेकांनी तिचे फोटो काढण्याचे प्रयत्न केले. या दरम्यान फोटो काढण्याचा प्रयत्न करणार्‍या युवकाला पोलिसाने चांगलाच चोप दिला. मात्र नंतर त्या युवकानेच त्या पोलिसाला दमदाटी केली. त्या पोलिसाच्या सहकार्‍यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली.

Web Title: Manorganj woman suffocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.