मनपा - वाहतूक पोलीस दिलजमाई
By Admin | Published: May 18, 2015 04:37 AM2015-05-18T04:37:11+5:302015-05-18T04:37:11+5:30
बृहन्मुंबई मनपा व वाहतूक पोलिस यांच्यातील कोंडी मिटण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन्हीही संघटनांचे प्रमुख भेटल्याने आता संघर्षाचे कारण राहणार नाही.
डिप्पी वांकाणी, मुंबई
बृहन्मुंबई मनपा व वाहतूक पोलिस यांच्यातील कोंडी मिटण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन्हीही संघटनांचे प्रमुख भेटल्याने आता संघर्षाचे कारण राहणार नाही. मुंबई मनपाचे आयुक्त अजय मेहता व वाहतूक प्रमुख मिलिंद भारंबे यांची बैठक झाली असून, भारंबे यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडवाव्यात असे मेहता यांनी सांगितले आहे. मुंबई वाहतूक पोलिसही नागरिकांशी मित्रत्वाने वागतील अशी राजधानी नवी दिल्लीच्या धर्तीवरची योजना वाहतूक खात्यातर्फे तयार करण्यात येत आहे.
याआधी वाहतूक खात्यातर्फे केलेल्या कोणत्याही मागण्या दुर्लक्षित केल्या जात , किंवा फेटाळल्या जात असत. मनपा आयुक्त मेहता अत्यंत मित्रत्वाने वागले, मनपाकडे पडून असलेला पैसा वाहतूक खाते अपडेट करण्यासाठी वापरण्याची तयारी त्यानी दाखवली असे भारंबे यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था सुधारणयस भारंबे यांनी मनपाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, सूचना मागविल्या आहेत.