मानसिंग पवार यांना मातृशोक
By Admin | Published: July 3, 2016 07:15 PM2016-07-03T19:15:39+5:302016-07-03T19:15:39+5:30
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांच्या मातृश्री रत्नप्रभा पवार यांचे रविवारी दुपारी २.१५ वाजता निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ३ : माजी खासदार स्व.बाळासाहेब पवार यांच्या पत्नी व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांच्या मातृश्री रत्नप्रभा पवार (८२) यांचे रविवारी दुपारी २.१५ वाजता निधन झाले.
अम्मा या नावाने त्या नातेवाईक व परिचितांमध्ये ओळखल्या जात होत्या. स्व.बाळासाहेब पवार यांना सर्वपरिस्थितीत त्यांनी मोलाची साथ दिली होती. अम्मांनी आपला परिवार मायेने जपला होता. त्यांच्या पश्चात मानसिंग व मंगलसिंग पवार हे दोन मुले व विजया देशमुख,संजया खानविलकर, अनिता चव्हाण, ज्योती मांधले या चार मुली, सूना,जावाई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अजय खानविलकर यांच्या त्या सासू होत्या.
निधनाची बातमी कळताच सिडको एन-१ येथील त्यांच्या निवासस्थानी लोकप्रतिनिधी,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जाऊन अम्माला श्रद्धांजली वाहीली. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सिडको एन-६ परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर वेदमंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसिंग पवार यांनी आईच्या पार्थीवाला अग्नी दिला. यावेळी वाकी येथील नारायणदेवबाबा, विधानसभाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, आ. सतिश चव्हाण, आ.अर्जून खोतकर, अनिल पटेल, कल्याण काळे,नामदेव पवार, सीएमआयएचे अध्यक्ष गुरप्रितसिंग बग्गा, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा,अरविंद माछर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक हजर होते.