मंत्रालयात सरपंच दरबार, दोनशेहून अधिक सरपंचांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:32 AM2018-02-02T04:32:58+5:302018-02-02T04:33:20+5:30
सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या हेतूने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या सरपंच दरबारात आज दोनशेहून अधिक सरपंचांनी हजेरी लावली.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरपंचांना आपल्या गावाच्या विकासाचे गा-हाणे थेट मंत्रालयात येऊन मांडता यावे आणि शासकीय योजनांबाबत त्यांना मार्गदर्शनही मिळावे व त्यातून सरकार-सरपंच संवाद वाढावा या हेतूने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या सरपंच दरबारात आज दोनशेहून अधिक सरपंचांनी हजेरी लावली.
दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मंत्रालयात हा सरपंच दरबार भरणार आहे. आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे होत्या. सरपंचांनी विशेषकरून घरकुल योजनेत येणाºया अडचणी, चौदाव्या वित्त आयोगातून मिळणारा निधी, ग्रामसभांमधील प्रश्न, आवश्यक असलेले अधिकचे मनुष्यबळ, सरपंचांची मानधनवाढ, ग्रामपंचायतींसाठी इमारतींची आवश्यकता असे विविध प्रश्न या वेळी मांडले. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले. या दरबारात आम्हाला का जाऊ दिले जात नाही, असा सवाल करीत काही महिला सरपंचांच्या पतींनी गोंधळ घातला, पण नंतर त्यांना शांत करण्यात आले.