माथेरानमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम
By admin | Published: May 19, 2016 03:16 AM2016-05-19T03:16:21+5:302016-05-19T03:16:21+5:30
माथेरान शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘लोकमत आपल्या दारी’
माथेरान : माथेरान शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ माथेरानकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शुक्रवार, २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरानमधील असेम्बली हॉलच्या जवळील पटांगणात रिगल हॉटेलचे मालक प्रताप हिरजी वेद आणि राजेश प्रताप वेद यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवणार येणार आहे.
‘लोकमत आपल्या दारी’च्या माध्यमातून शहरातील समस्या मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांना आहे. या कार्यक्रमात शहरातील मूलभूत तसेच पायाभूत सुविधा सोडविण्यावर भर देण्यात येणार
आहे.
पर्यटनस्थळ म्हणून शहराचा विकास, त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी उपाययोजना, टॅक्सीचालकांना पर्याय म्हणून सुरू असलेली बससेवा
व तिच्या फेऱ्या वाढविण्याबाबत
प्रयत्न आदी विषयांवर चर्चा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे करण्यात येत आहे.
(वार्ताहर)