उत्पादकांना द्राक्षे आंबट!

By admin | Published: April 29, 2017 02:17 AM2017-04-29T02:17:18+5:302017-04-29T02:17:18+5:30

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षाला विक्रमी निर्यातीनंतरही त्याच्या पंढरीतच निचांकी भाव मिळत आहे

Manufacturers grapes sour! | उत्पादकांना द्राक्षे आंबट!

उत्पादकांना द्राक्षे आंबट!

Next

निफाड/नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षाला विक्रमी निर्यातीनंतरही त्याच्या पंढरीतच निचांकी भाव मिळत आहे, त्यामुळे बागायतदारांना घाम फुटला आहे. घाऊक बाजारपेठेत द्राक्षाला किलोमागे कमीतकमी केवळ १० रुपये असा दशकातील नीचांकी भाव मिळत असल्याने उत्पादकांना द्राक्ष आंबट झाले आहेत.
बाजारात अजून नवा माल येणार असल्याने भाव अजून गडगडण्याची भीती आहे. एक एकर द्राक्ष बागेसाठी वर्षाला किमान दोन लाख रु पये खर्च येतो. मागील वर्षी द्राक्षाला किलोमागे ४२ ते ४५ रुपये भाव मिळत होता. यंदा भाव केवळ १० ते १७ रुपयांदरम्यान आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात निर्यातक्षम द्राक्षाला ७० ते ७५ रुपये भाव होता. देशांतर्गत बाजारपेठेत मालास मागणी नसल्याने भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची घट झाल्याने उत्पादन खर्च निघनेही अवघड झाले आहे.
मागील वर्षी युरोपमध्ये ७६ हजार ४२५ टन, तर युरोपव्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Manufacturers grapes sour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.