रिझवानचे अनेक दिवस गोव्यात वास्तव्य

By admin | Published: January 26, 2016 03:09 AM2016-01-26T03:09:54+5:302016-01-26T03:09:54+5:30

इंडियन मुजाहिद्दीनच्या बाबतीत थंड पडलेला महाराष्ट्र एटीएसचा तपास आता पुन्हा वेग घेत आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रिझवानने गोव्यात एका अपार्टमेंटमध्ये जागा भाड्याने घेऊन काही

Many days of Rizwan lived in Goa | रिझवानचे अनेक दिवस गोव्यात वास्तव्य

रिझवानचे अनेक दिवस गोव्यात वास्तव्य

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
इंडियन मुजाहिद्दीनच्या बाबतीत थंड पडलेला महाराष्ट्र एटीएसचा तपास आता पुन्हा वेग घेत आहे. उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या रिझवानने गोव्यात एका अपार्टमेंटमध्ये जागा भाड्याने घेऊन काही काळ वास्तव्य केल्याचेही समोर येत आहे.
एटीएसने केलेल्या तपासात असे आढळून आले आहे की, रिझवान हा गोव्यात काही महिने एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. भाड्यापोटी त्याने ३० हजार रुपये भरल्याचेही समोर आले आहे. गोवा -कर्नाटकमधील खाण माफियांकडून रिझवान डिटोनेटर्स खरेदी करण्यासाठी गेला होता का? याचा तपास सद्या सुरू आहे. कारण, इंडियन मुजाहिद्दिनने देशभरातील आॅपरेशनसाठी एकाच प्रकारचे डिटोनेटर्स, स्फोटके खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रिझवानचा ‘हॅण्डलर’ यूसूफ याने डिटोनेटर्स खरेदी करण्यास रिझवानला सांगितले होते का, याचाही तपास एटीएस करीत आहे.
मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या मुदब्बीर शेखकडे मोठ्या प्रमाणात पैसा हस्तांतरीत करण्यात आला होता. मुदब्बीरकडे तरुणांना भरती करण्याची जबाबदारी होती. शहरातील दोन मोठे हवाला आॅपरेटर्स सद्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ज्यांनी मुदब्बीरशी ५.८ लाख रुपयांची देवाणघेवाण केली. यातील ५० हजार रुपये औरंगाबादेतून पकडण्यात आलेल्या इब्राहिमला देण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणीतून पळून गेलेल्या आणि पुन्हा परत आलेल्या वाजिद शेख आणि नूर मोहम्मद या दोन तरुणांचे भविष्य आता रिझवानच्या जबाबावर अवलंबून आहे. हे दोघे तरुण अतिरेकी कारवायात सहभागी होण्यासाठी गेले मात्र, पुन्हा परत आले. आपण निर्दोष असल्याचे हे दोघेही तपास अधिकाऱ्यांपुढे सांगत आहेत. त्यामुळे या दोघांबाबत रिझवान काय सांगतो हे महत्वाचे आहे. आता रिझवानला थेट त्यांच्या समोर आणले जाईल.पणजी : गोव्यावर लिक्विड बॉम्बहल्ला करण्याचा इसिसचा डाव होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) उघडकीस आणली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हरिद्वार येथे अटक केलेल्या इसिसच्या हस्तकांनी चौकशीदरम्यान ही कबुली दिली. गोव्यात हल्ला करण्यासाठी जागाही निश्चित केली होती आणि स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारे हायड्रोजन पॅरॉक्साइड, गन पावडर, पाइप व इतर साहित्यही जमा करण्यात आले होते. परंतु सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा डाव उद्ध्वस्त करताना या मोहिमेत गुंतलेल्या अतिरेक्यांना अटक केली. नेमका कोणत्या ठिकाणी आणि केव्हा हल्ला घडवून आणण्याचा डाव होता, याची माहिती मात्र सुरक्षा यंत्रणेने गुप्त ठेवली आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा अब्दुस सुभान कुरेशी उर्फ तौकीर आणि त्याच्या दोन साथीदारांनी भारताविरुद्धच्या आॅपरेशनसाठी इसिसशी हातमिळवणी केली असल्याचे सांगितले जाते. तथापि, इंडियन मुजाहिद्दीनचा युसूफ ऊर्फ शफी अम्मार याची सीरियात इसिसमध्ये भरती करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. भारताविरुद्धच्या कारवायांसाठीच ही भरती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Many days of Rizwan lived in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.