बेपत्ता सख्ख्या बहिणींचे अखेर मृतदेहच आढळले; चव्हाण कुटुंबियांत पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:27 AM2023-01-17T10:27:27+5:302023-01-17T10:27:38+5:30

या दोघी बहिणी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

Many of the missing sisters were eventually found dead; Mourning spread in the Chavan family | बेपत्ता सख्ख्या बहिणींचे अखेर मृतदेहच आढळले; चव्हाण कुटुंबियांत पसरली शोककळा

बेपत्ता सख्ख्या बहिणींचे अखेर मृतदेहच आढळले; चव्हाण कुटुंबियांत पसरली शोककळा

googlenewsNext

कन्नड (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील चिखलठाण येथून १४ जानेवारीला बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचे  मृतदेह गावशिवारातील विहिरीतील पाण्यात सोमवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वाती (१८) व शीतल दत्तू चव्हाण (१५) अशी मृत बहिणींची नावे आहेत. 

या दोघी बहिणी १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता घरातून निघून गेल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या आढळल्या नाहीत. त्यामुळे वडील दत्तू चव्हाण यांनी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात याच दिवशी सायंकाळी तक्रार दाखल केली होती. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास शेतातील विहिरीत स्वातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना  आढळला. तथापि, शीतलचा शोध लागत नव्हता. त्यानंतर विहिरीतील पाण्यात टाकलेल्या गळाला शीतलचाही मृतदेह दुपारी ३.२० च्या सुमारास लागला.  

स्वाती बारावीला आली होती शाळेत दुसरी
मृत स्वाती चव्हाण ही मार्च २०२२ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ७६ टक्के गुण मिळवून चिखलठाण येथील शाळेतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती, तर शीतलने आठव्या इयत्तेपासून शाळा सोडली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील असा एवढाच परिवार आहे.

Web Title: Many of the missing sisters were eventually found dead; Mourning spread in the Chavan family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.