सदनिकांच्या आमिषाने अनेकांना लाखोंचा गंडा

By admin | Published: April 17, 2017 03:15 AM2017-04-17T03:15:07+5:302017-04-17T03:15:23+5:30

भिवंडीच्या कशेळी आणि काल्हेर परिसरांत अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा जणांकडून प्रत्येकी लाखो रुपये उकळणाऱ्या

Many people lend millions to the lanes of the house | सदनिकांच्या आमिषाने अनेकांना लाखोंचा गंडा

सदनिकांच्या आमिषाने अनेकांना लाखोंचा गंडा

Next

ठाणे : भिवंडीच्या कशेळी आणि काल्हेर परिसरांत अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा जणांकडून प्रत्येकी लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार बहादूर सिंग (४२) याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या आणखी एका साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिकांकडे काही कामे करीत असल्यामुळे माझी त्यांच्याकडे चांगली ओळख आहे. काल्हेर व कशेळी भागांत सदनिका बुक केल्यास मोठी सवलत देतो. उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरा, अशी बतावणी करीत वेगवेगळ्या लोकांकडून सरोजकुमारने दीड लाखांपासून ते सात लाखांपर्यंत पैसे गोळा केले. त्यांना सदनिका किंवा पैसेही न देता नंतर मात्र नॉट रिचेबल झाला. लोकमान्यनगर भागात तो आल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि हवालदार भूषण गावडे यांच्या पथकाने त्याला १४ एप्रिल रोजी अटक केली. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
सावरकरनगर भागातील नयनेश मोदी यांनाही कशेळी भागात सदनिका देण्याचे आमिष दाखवून मार्च २०१२ मध्ये त्यांच्याकडून त्याने सात लाख रुपये घेतले. याप्रकरणी त्यांनी त्याच वेळी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सावरकरनगर भागातील अनिल गुप्ता यांच्याकडूनही १८ लाखांमध्ये वन बीएचके सदनिका बुकिंग करण्याच्या नावाखाली एक लाख ५१ हजार रुपये त्याने घेतले होते. तर, शीतलाप्रसाद जयस्वाल यांच्याकडून नऊ लाखांची वन बीएचके सदनिका बुकिंगसाठी २०१३ मध्ये दोन लाख रुपये त्याने घेतले. धनादेश आणि आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारून लोकांना त्याने रीतसर पावत्याही दिल्या. त्यामुळेच कोणालाही त्याच्यावर किंवा त्याच्या साथीदारांवर संशय आला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Many people lend millions to the lanes of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.