...अनेकांना वाटत होते मी राजकारणातून निवृत्त होईन..! शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 04:04 PM2020-01-16T16:04:54+5:302020-01-16T16:05:55+5:30

महाराष्ट्रातील जनतेने तसे काही घडु दिले नाही...

... Many thought I would retire! Sharad Pawar stroke to former chief minister | ...अनेकांना वाटत होते मी राजकारणातून निवृत्त होईन..! शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

...अनेकांना वाटत होते मी राजकारणातून निवृत्त होईन..! शरद पवार यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती येथे आयोजित ''कृषिक २०२० प्रदर्शन '' उद्घाटन

बारामती :  अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातात पुष्पगुच्छ देत बहुदा आपण आता राजकारणातून निवृत्त व्हा, असे तर हे  दोघे मला सांगत आहे का सांगत आहेत का असेच वाटले. भाषणाच्या सुरूवातीलाच पवार यांनी आपल्या सत्कारासंदर्भात सत्काराचा मिश्कीलपणे उल्लेख करीत अशी टिप्पणी केली.तसेच अनेकांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी मी राजकारणातून निवृत्त होईन असे वाटत होते पण तसे काही घडले नाही.महाराष्ट्रातील जनतेने तसे काही घडु दिले नाही,अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला.  

बारामती येथे आयोजित ''कृषिक २०२० प्रदर्शन '' उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली राजकीय कोटी उपस्थितांमध्ये चर्चेचा चांगलाच विषय ठरली. यावेळी पवार पुढे म्हणाले, आज जागतिक स्थिती बदलली आहे. त्यातून सतत नवे कृषी संशोधन आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, माणसांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शेतीत नवनवीन संशोधन करण्याची गरज आहे. देशात न्यायालयाने कृषी संशोधन करण्यावर बंदी घातली आहे. न्यायाधीशांचे हे काम आहे का? यावर मला भाष्य करता येणार नाही. पण त्यांनी अशा गोष्टीत लक्ष न घातलेलं बरं. काही अपायकारक होत असल्यास ते थांबवण्यास माझी मनाई नाही .मात्र, जे उपायकारक असेल ते करण्यास काही हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री उपस्थित आहेत. त्यांनी प्रदर्शनातील प्रात्यक्षिके अभ्यासून राज्यातील इतर भागांमध्ये याचा फायदा कसा करता येईल, यासंबंधी विचार करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
———————————

Web Title: ... Many thought I would retire! Sharad Pawar stroke to former chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.