माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 01:54 PM2018-10-26T13:54:22+5:302018-10-26T14:25:50+5:30

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला.

Maoist case: Bhardwaj, Gonsalvi and Farera's bail rejected | माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

माओवादी संबंध प्रकरणातील भारद्वाज,गोन्सालवीस व फरेरा यांचा जामीन फेटाळला

Next
ठळक मुद्देगडलिंग व सेन यांच्या अर्जावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांच्या जामिनावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय होणार होणार

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या अ‍ॅड. सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अ‍ॅड. अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला. तर अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग आणि प्रा. शोमा सेन यांच्या जामिनावर १ नोव्हेंबरनंतर निर्णय होणार होणार आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी तीनही आरोपींचा जामीन नाकारला. 
या निकालाच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती बचाव पक्षाच्या वकिलांकडून देण्यात आली. तसेच नजरकैदमध्ये एका आठवड्याची वाढ करण्यात यावी असा अर्ज देखील करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. राहुल देशमुख आणि अ‍ॅड. सिद्धार्थ पाटील यांनी दिली.जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरोधात  दोषाआरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुदतवाढ दिली होती. परंतु, ती मुदतवाढ बेकायदेशीर ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे. मात्र, महाधिक्तायांच्या विनंतीवरून या आदेशाला आठवडाभराची (१ नोव्हेबरपर्यंत) स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. मुदतवाढीला स्थगिती मिळाल्याने जामिनासाठी अर्ज केलेल्या अ‍ॅड. गडलिंग आणि सेन यांच्या अर्जावर देखील १ नोव्हेंबरनंतर सुनावणी होणार आहे. तर भारद्वाज, गोन्सालवीस, अ‍ॅड. फरेरा यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल करण्याची मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे त्यांच्या जामिनावर सुनावणी घ्यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर त्यावर शुक्रवारी निकाल झाला. दोषारोपपत्र दाखल करण्याची मुदतवाढ रद्द झाल्यास सुधीर ढवळे, शोमा सेन, रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: Maoist case: Bhardwaj, Gonsalvi and Farera's bail rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.