मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:03 AM2017-07-30T00:03:01+5:302017-07-30T00:03:14+5:30

maraathavaadayaataila-rasatayaansaathai-65-hajaara-kaotaincaa-naidhai | मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी

मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी

Next

मंठा (जि. जालना) : केंद्र सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांच्या विकासासाठी सर्वाधिक तरतूद केली आहे. विशेषत: मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ६५ हजार कोटींचा निधी दिला असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे शनिवारी दुपारी गडकरी यांच्या हस्ते शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाच्या कोनशीलेचे भूमिपूजन झाले. गडकरी म्हणाले, ‘परभणी व जालना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी अकरा हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. जालन्यातील ड्रायपोर्ट, नांदेडमधील सी-पोर्टचा मराठवाड्यातील उद्योजकांना मोठा फायदा होईल.’
शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गावर अपघात होऊन दहा वारकºयांचा मृत्यू झाला होता. यापुढे पांडुरंगाच्या भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी हा मार्ग सिमेंट क्राँकिटीकरणाचा करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २०१८ अखेर हे काम पूर्ण होईल. या मार्गावर २०० वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

Web Title: maraathavaadayaataila-rasatayaansaathai-65-hajaara-kaotaincaa-naidhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.