दलित विरोधात मराठा हा तर संघाचा डाव - रिपाइं
By Admin | Published: September 18, 2016 09:32 PM2016-09-18T21:32:58+5:302016-09-18T21:32:58+5:30
मराठा क्रांती मोर्चाद्वारे मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी मोर्चे काढत आहे. तरी या मोर्चांना दलितविरोधात मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून
>चेतन ननावरे/ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.18- मराठा क्रांती मोर्चाद्वारे मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी मोर्चे काढत आहे. तरी या मोर्चांना दलितविरोधात मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. दलित आणि मराठा समाजाने संघाच्या डावाला बळी पडू नये, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केले आहे.
खरात म्हणाले की, राज्यात दलित आणि मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा रोष बाहेर पडत आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची कार्यवाहीसुद्धा थंड पडली आहे. मात्र या दोन महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, म्हणून संघ आणि भारतीय जनता पार्टीकडून मराठी क्रांती मोर्चाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र समाजाने या राजकारणाला बळी न पडता, आपल्या मागण्या जोमाने रेटण्याची गरज खरात यांनी व्यक्त केली आहे.