जळगावात मराठा समाजाचा विराट मोर्चा
By admin | Published: August 29, 2016 03:21 PM2016-08-29T15:21:40+5:302016-08-29T15:21:40+5:30
कोपर्डी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ मराठा समाजाने सोमवार, २९ आॅगस्ट रोजी जळगावात ऐतिहासिक असा विराट मोर्चा काढत समाजाच्या एकजुटीची ‘क्रांती’ घडवून आणली.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 29 - कोपर्डी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ मराठा समाजाने सोमवार, २९ आॅगस्ट रोजी जळगावात ऐतिहासिक असा विराट मोर्चा काढत समाजाच्या एकजुटीची ‘क्रांती’ घडवून आणली. ‘आमच्या पोरांची अब्रू इतकी स्वस्त कशी, कोपर्डीच्या नराधमांना तत्काळ फाशी द्या’ अशा संतप्त भावना व्यक्त करीत मराठा बांधवांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरत मनामनातील संताप या मोर्चातून व्यक्त केला. मोर्चाच्या निमित्ताने मराठा बांधवांची एकता तसेच मौन, शिस्त व स्वच्छता हे या मोर्चाचे वैशिष्ट्य असल्याचे दिसून आले.
जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयातून दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. कोर्ट चौक, नेहरु चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल, नवीन बस स्टँडमार्गे स्वातंत्र्यचौकातू मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला.